Breaking News | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उभी फूट..?, १० आमदारही नॉट रीचेबल

0
26
Ashok Chavhan
Ashok Chavhan

Breaking News | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी होत असून, यात विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे दिसत आहे. आज सकाळपासूनच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आजच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. अशा चर्चांना उधाण आले असतानाच, आता अशोक चव्हाणांनीच याला दुजोरा दिला असून, त्यांनी आमदारकीचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

आधी दक्षिण मुंबईतील  काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा, नंतर बाबा सिदद्की आणि आता अशोक चव्हाण यांनीही पक्षाची साथ सोडल्याने काँग्रेस खिळखिळा होणार यात शंकाच नाही. आज सकाळपासूनच अशोक चव्हाण हे ‘नॉट रीचेबल’ आहेत. त्यांच्यासह त्यांच्या स्वीय्य सहाय्यकांचेही फोन बंद असल्याची माहिती आहे. (Breaking News)

Maharashtra Congress | ज्यांना पक्ष सोडून जायचंय, त्यांनी लवकर जावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला

Breaking News | हे आमदारही ‘नॉट रीचेबल’..?

केवळ अशोक चव्हाणच नाहीतर, त्यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी १० आमदार हे ‘नॉट रीचेबल’ असून, तेदेखील आज चव्हाणांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हे आमदार पुढीलप्रमाणे…

  1. नसीम खान, माजी आमदार, चांदिवली
  2. चंद्रकांत हंडोरे (माजी आमदार – चेंबूर)
  3. राजू पारवे (आमदार – उमरेड)
  4. विकास ठाकरे (आमदार – पश्चिम नागपूर)
  5. मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण)
  6. जितेश अंतापूरकर (देगलूर नांदेड)
  7. सुभाष धोटे (राजुरा, चंद्रपूर)
  8. अमित झनक (रिसोड, वाशिम)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारावर अशोक चव्हाण आणि या आमदारांचा नाराजीचा सुर असल्याचे सांगितले जात आहे.

अधिक माहितीनुसार, अशोक चव्हाण हे काल आयोजित काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही उपस्थित होते. त्यावेळीही त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. परवा ते काँग्रेसच्या जिल्हा स्तरीय बैठकीलाही उपस्थित नव्हते. तसेच मागील दोन दिवस अशोक चव्हाण दिल्लीत होते. याठिकाणी त्यांनी काही भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केली असून, तेव्हाच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. (Breaking News)

दरम्यान, भाजपकडून अशोक चव्हाण यांना मोठी ऑफर आली असून, त्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच, आजच भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादीदेखील प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या यादीत अशोक चव्हाणांच्या नावाचाही समावेश असू शकतो.

Ashok Chavhan | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर..?

आगे आगे देखिये होता है क्या… 

काँग्रेसच नाहीतर आणखीही अनेक पक्षातील बडे नेते हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच काँग्रेसमधील आणखीही अनेक नेते हे आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी तसेच अंतर्गत राजकारणाला हे नेते कंटाळले असून, काँग्रेसमधील मुस्कटदाबी व मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहून या नेत्यांना वाटतं की आता त्यांनी मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत आणि आणखी कोण कोण भाजपात येणार? या प्रश्नावर मी इतकंच बोलेले की, आगे आगे देखीए, होता है क्या! अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Breaking News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here