Skip to content

Breaking news : त्यांनी आपले दागिने विकून ठेवले शिक्षण अधिकाऱ्यांच्या टेबलवर नोटांचे बंडल ; हे आहे कारण


Breaking news : अनुदानासाठी संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले नोटांचे बंडल, शिक्षण उपसंचालकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

मागील वीस वर्षांपासून शैक्षणिक संस्थेला अनुदानापासून वंचित ठेवल्याने याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या संस्थाचालकांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलावर नोटांचे बंडल ठेवत आंदोलन केले आहे.

संस्थाचालकांच्या आक्रमक पवित्र नंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी नाशिक शिक्षण उपसंचालकांना घडलेल्या आंदोलनाची भ्रमणध्वनी वरून माहिती दिल्याने नाशिक शिक्षण उपसंचालकांनी मंगळवारी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह संस्थाचालकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने संस्थाचालकांनी आंदोलन स्थगित केले आहे. या अनोख्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली होती.

https://thepointnow.in/extra-material-affair/

शहरातील सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांची इंदिरा महिला प्रायमरी ही शाळा 2002 पासून अस्तित्वात आहे. शिक्षण विभागा कडून वेळोवेळी या संस्थेला भेट देण्यासह कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.breaking news

याबाबत तत्कालीन प्राथमिक उपशिक्षणाधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता असल्याचा अहवाल देऊनही संस्थेचा अनुदानासह इतर प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या संस्थाचालक प्रभा परदेशी यांनी दागिने मोडून, पैशांची जमवा जमव करून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्या यांच्या टेबलावर नोटांचे बंडल टाकत प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.breaking news

यावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सदरची माहिती नाशिक शिक्षण उपसंचालकांना दिल्याने त्यांनी मंगळवारी नाशिक येथे संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मिळालेल्या आश्वासनानंतर संस्थाचालकांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केल आहे.  मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील प्रभा परदेशी यांनी शिक्षण विभागाला दिला आहे. breaking news

याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरचा अनुदानाचा प्रश्न मनपाच्या शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे 2002 ते 2011 पर्यंत ची मान्यता व अनुदान मनपाच्या शिक्षण विभागाने दिल्यास त्याच दिवशी माझ्याकडून देखील मान्यता देण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.breaking news


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!