बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळते. याठिकानाहून जवळच असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर गौतमी गोदावरी नदीचे उगमस्थान असल्याच देखील मानलं जातं. या ब्रह्मगिरी पर्वत व हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणाऱ्या अंजनेरी पर्वताला रोपवेच्या सहाय्याने जोडण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 376.73 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीकडून साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी 31 जुलै पर्यंत टेंडर मागविण्यात येणार आहेत, याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी माहिती दिली आहे.
नाशिक हे राज्यसह देशभरातील पर्यटकांच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून नावोदयास आहे. जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे असल्याने नाशिक मध्ये वर्षभर पर्यटकांची मांदियाळी बघायला मिळते. यामुळे नाशिकला एक वेगळी ओळख आता या दृष्टीने मिळत आहे. दरम्यान या पर्वतरांगेवर गोदावरी व वैतरणा या दोन प्रमुख नद्यांचा उगम झालेला आहे. यातील गोदावरी नदीला दक्षिण भारताची जीवन वाहिनी म्हणून ओळखलं जातं तर वैतरणा नदीवरील धरणामुळे मुंबईची पाण्याची गरज भागविली जाते याच नद्यांच्या उगमस्थान असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अंजनेरी व ब्रह्मगिरी हे दोन पर्वत आहेत. पर्यावरणीय दृष्ट्या ही पर्वतरांग अतिशय संवेदनशील मानली जाते. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना हे दोन्ही पर्वत उंचीवर असल्याने वर पर्यंत जाणे शक्य होत नाही. यामुळे या धार्मिक पर्वतांना जोडणारा रोपवे उभारण्यात येणार आहे.
या रोपवेच्या प्रकल्पाचा मुख्य कंट्रोल रूम हा पेगलवाडी या ठिकाणी राहणार असून 5.7 किलोमीटर या रोपवे ची उंची असणार आहे. जवळपास पावणे चारशे कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करण्यात येणार असल्याचं खासदार गोडसे यांच्याकडून सांगण्यात आल आहे.
दरम्यान सुरुवातीला हे भाग अति संवेदनशील असल्याने पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी पर्वताची हानी होण्याची शक्यता लक्षात घेता या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. पर्वतावर जाणाऱ्या भाविकांची संख्या मर्यादित असल्याने हा विरोध करण्यात येत होता. तसेच मर्यादित भाविकांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची गरज नसल्याचे मत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केलं होतं. मात्र त्यानंतर देखील हा प्रकल्प रेटला जात असल्याचं बोललं जात आहे. तर कार्यादेश दिल्यानंतर पुढील दोन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम