द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. “ब्राह्मण असल्याचा आम्हाला अभिमान आहे,” असे त्या म्हणाल्या. सोमवारी नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
“आम्ही ब्राह्मण आहोत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. विचारवंत असल्याचा, स्वाभिमानी असण्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्याकडे कोणतीही कमतरता नाही. पण आम्ही स्वतःला मार्केट करू शकत नाही,” अमृता फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस न विचारता मुख्यमंत्री झाले. त्यांनी कधीही या पदासाठी विचारणा केली नाही. त्यांची कार्यशैली, जनसेवा पाहून मोदी आणि वरिष्ठांनी त्यांना मुख्यमंत्री केले,’ असेही त्यांनी नमूद केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम