Bmc News : माजी महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल ; हे आहे कारण

0
17

Bmc News : कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेत झालेल्या कथित कोविड घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे कथित कोविड घोटाळा

अंमलबजावणी संचालनालयाकडून मुंबईमधील कथित कोविड घोटाळ्यावरून काही दिवसांपूर्वी छापेमारी सत्र राबवण्यात आलं होतं. कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप ईडी कडून करण्यात आला होता.(bmc news)

https://thepointnow.in/amdar-niwas/

कोरोना काळात संबंधित औषधांच्या खरेदी या वाढीव दरामध्ये करण्यात आल्या होत्या तसेच बॉडीबॅगची खरेदी करत असताना देखील वाढीव दर लावण्यात आले असल्याचं सांगत ईडीने घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता.(bmc news)

दरम्यान दोन हजार रुपये किमतीची बॉडीबॅग ही 6 हजार 800 रुपयांना खरेदी करण्यात आली असून तत्कालीन माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आलं असल्याचा दावा केला जात आहे. मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र त्यांचा आक्षेप डावलून हे कंत्राट देण्यात आलं असल्याचे देखील म्हणणं आहे.(bmc news)

किरीट सोमय्या यांनी दिली पेढणेकरांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचं बोललं जात आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.(bmc news)

ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी नेमकं काय म्हटल

“कोविड घोटाळा. उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोविड कफन(मृतदेह बॅग) मध्ये देखील कमाई केली. 1 हजार 500 रुपयांची बॉडी बॅग 6 हजार 700 रुपयांमध्ये विकत घेतली. वेदांत इन्नोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल.” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.(covid scam)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here