बारामती : सद्या देशात विकृती वाढली असून त्याचा परिणाम देखील जाणवत आहे. नुकतेच बारामतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे, एका विवाहितेने लॉजवर भेटण्यास नकार दिल्याने आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट केल्याप्रकरणी एका महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. शारिरीक संबंध दोघात प्रस्थापित असताना एकमेकांना विश्वासाने सर्व शेअर करणाऱ्या या महिलेला चांगलाच फटका बसला आहे.
या गुन्ह्यातील आरोपीने संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ आणि फोटो काढले होते, मात्र नंतर त्याचा गैर वापर केला आहे. तिला लॉजवर येण्याची मागणी केली होती. आली नाही तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटवर पोस्ट करेल अशी धमकी दिली होती आणि तसे करत महिलेला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण मच्छिंद्र वीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रांजणगाव येथील रहिवासी आहे. २६ वर्षीय तक्रारदार आरोपीच्या बहिणीच्या शेजारी राहत होती. सप्टेंबर 2021 मध्ये तो त्याच्या बहिणीला भेटायला गेला तेव्हा दोघांची भेट झाली. तिचा नवरा कामावर गेला असताना आरोपी तिच्या घरी बसायला येत होता. यातून त्याने तिच्याशी गोड बोलून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांमध्ये विवाहितेचे निवासस्थान शेजारी असलेल्या लॉजवर वारंवार शारीरिक संबंध सुरू झाले. त्यावेळी सेक्स करताना त्याने न्यूड व्हिडिओ आणि फोटो काढले होते.
फेब्रुवारी २०२२ मध्ये तो त्याच्या गावी निघाला. त्यानंतर एप्रिलमध्ये आरोपीने महिलेला लॉजवर भेटायला बोलावले. तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नसल्यामुळे तिने त्याला भेटण्यास नकार दिला. त्याच दिवशी त्याने तिला दोघांचे न्यूड फोटो पाठवले. भेट न झाल्यास पती आणि भावाला फोटो पाठवण्याची धमकीही आरोपीने दिली. त्यानंतर काही वेळातच त्याने तिला तिच्यासोबतच्या नातेसंबंधाचा व्हिडिओ पाठवला. मात्र, फिर्यादीने दाद दिली नाही. त्यानंतर 27 मे रोजी त्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर दोघांचे न्यूड फोटो पोस्ट केले. यानंतर मात्र महिला तिथून निघून गेली. तिने आरोपीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा स्क्रीनशॉट घेतला व पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम