Political crisis : फोडणं सोपं आहे हिम्मत असेल तर बांधून दाखवा ; भाजपचे धाकट्या ठाकरेंना थेट आव्हान

0
25

Political crisis : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे नाशिकमध्ये आले असताना त्यांना नाशिक सिन्नर दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ थांबून राहावे लागले होते. याचाच राग धरत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावेळी अमित ठाकरे यांना माध्यमांनी याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी राज साहेबांमुळे 35 टोल नाके बंद झाले माझ्यामुळे एक फुटला असं उत्तर दिलं होतं. मात्र यालाच प्रत्युत्तर देत भाजपकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय म्हटलं गेलंय भाजपच्या व्हीडिओ मध्ये

भाजपाने म्हटले आहे की, टोल नाका फोडल्याच समजल्यानंतर अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा”फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिटं थांबवली. असे भाजपाने म्हटले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांचे भाजपला प्रत्युत्तर

अमित ठाकरे यांच्यावर टिका करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे नेदे संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र भाजपला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही दादागिरी करीत नाही. दादागिरी करणे हे आम्हाला कोणाकडून शिकण्याची गरज नाही. तर ज्यांनी आयुष्यभर इतरांचे पक्ष फोडले त्यांनी टोलनाक्यावर बोलू नये नाही. तर भाजपनेच सत्ते येण्याआधी महाराष्ट्र टोलमुक्त करू असे आश्वासन दिले होते. ते आता विसरले का?, टोलनाका फोडण्यावर बोलणारे मणिपूर हिंसाचारावर का थोबाड उघडत नाहीत असेही टिका प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाजपवर केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्रातील टोल नाके हे समीकरण जनतेसाठी नवीन नाही. टोलनाक्यांसाठी राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका नेहमीच आक्रमक असल्याचं बघायला मिळतं. राज्यातील जवळपास 60 हुन अधिक टोलनाके राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बंद पडले आहेत.

https://thepointnow.in/black-market-sale-of-ration-rice/

यातच त्यांचे चिरंजीव युवा नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. याप्रकरणी जवळपास आठ जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतल आहे तर 15 ते 20 जण फरार असल्याचे देखील सांगण्यात आलं आहे. मात्र अमित ठाकरे यांच्यावर भाजपने आपल्या व्हिडिओद्वारे केलेली ही टीका चर्चेचा विषय ठरत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here