द पॉईंट नाऊ ब्युरो : राजकारणात कोणत्या क्षणाला काय घडेल काही सांगता येत नाही. आता बंड केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना भाजपने उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे बोलले जात होते. उद्धव ठाकरे यांनी आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे देखील सांगितले. मात्र संजय राऊत यांनी ठाकरे राजीनामा देणार नसल्याचे सांगितल्याने बाजी पलटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यात आता महत्वपूर्ण बातमी अशी की, एकनाथ शिंदे यांना भाजपने उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता राजकारणात नेमक्या काय हालचाली होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने महाविकास आघाडीत न राहता भाजप सोबत सत्ता स्थापन करावी तर आम्ही परत येऊ असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिला होता. तर आता इकडे भाजपने शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचे सांगितले जात असल्याने, हा नेमका काय खेळ चालू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेने जर मागण्या मान्य केल्या नाहीत, तर शिंदे हे भाजपसोबत सरकार बनवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आता महाराष्ट्रात नेमके पुढे काय होते, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम