BJP Media Representative | विरोधकांना उत्तरं देण्यासाठी भाजपच्या फायरब्रँड नेत्यांची टीम; भारती पवारांवर मोठी जबाबदारी

0
135
BJP Media Representative
BJP Media Representative

BJP Media Representative :  लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सेट केलेल्या संविधान बदल आणि इतर खोट्या नरेटीव्हजचा फटका बसल्याचे भाजप नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा विरोधकांच्या टिका, टिप्पणी, वक्तव्यांना सडेतोड उत्तरं देण्यासाठी भाजपने आपल्या दहा फायर नेत्यांची टीम तैनात केली आहे. याबाबत स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली असून, त्यांनी या दहा नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला आता जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपने वेगवेगळ्या सत्रात वेगवेगळ्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. तर, काही नेत्यांची विभागनिहायदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.

BJP Media Representative | ‘या’ वेळेत ‘हे’ नेते देणार प्रतिक्रिया 

रोज सकाळी 9 वाजता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यासाठी मध्यमांसमोर येतात. त्यानुसार आता भाजपचेही चार नेते दररोज सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया देणार आहेत. सकाळच्या सत्रात पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे चार नेते प्रतिक्रिया देतील. तर संध्याकाळी 4 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपने थेट मंत्र्यांनाच मैदानात उतरवले असून, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, चव्हाण, अतुल भातखळकर आणि राम कदम हे दिग्गज नेते विरोधकांना प्रत्युत्तर देतील. (BJP Media Representative)

BJP | देशभरात भाजपमध्ये मोठ्या घडामोडी; जिल्हाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष सगळे बदलणार..?

भारती पवारांवर मोठी जबाबदारी

केवळ वेळेनुसारच नाहीतर भाजपकडून विभागवार बोलण्यासाठीही तब्बल 20 नेत्यांची टीम जाहीर केली असून, भाजपच्या या विभागीय टीममध्ये आजी माजी खासदारांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि दिंडोरी लोकसभेच्या माजी खासदार व केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा समावेश असणार आहे. (BJP)

शिंदेंचा 100 जागांचा आग्रह; भाजपला जास्तीत जास्त जागा हव्यात..?

लोकसभेत भाजपला राज्यात मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सूक्ष्म नियोजन आणि जय्यत तयारी केली जात आहे. तर, दुसरीकडे महायुतीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत जागावाटपावरून रस्सीखेच होणार असे दिसत आहे. याचे कारण म्हणजे भाजपने युतीत जागा लढवण्याचा स्थानिक नेत्यांचा आग्रह असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची जगावाटप आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली.

BJP Goverment | ४०० पार सोडा, आता सत्तास्थापनेसाठीही दुसऱ्यांचे पाय धरावे लागणार..?

मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत 100 जागांची मागणी केली असून, शिंदे गटाची ही मागणी मान्य केल्यास भाजपला मागील निवडणुकीपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागेल. त्यामुळे भाजपने जास्तीत जास्त जागा लढवाव्या.170 ते 180 जागा भाजपने आपल्याकडे घ्याव्यात, असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुण्यात होणाऱ्या एक दिवसीय संमेलनापूर्वी भाजप विधानसभेच्या किती जागा लढवणार हे निश्चित होईल, असा अंदाज आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here