BJP Manse Yuti | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी या राज्याच्या राजकारणात होत आहेत. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर काँग्रेसचेही राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारखे दोन गट पडतील का..? अशा चर्चा होती. दरम्यान, आता काँग्रेस नाहीतर मनसे महायुतीमध्ये सामील होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर खलबतं झाली. (BJP Manse Yuti)
दरम्यान, आता पुन्हा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल एक तास बंद दाराआड चर्चा झाली. यावर अखेर राज ठाकरे यांनीही मौन सोडले असून, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीत भाजप-मनसे युतीसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तर, राज ठाकरे यांना महायुती सरकारमध्ये सामील होण्याची ऑफर असल्याचीही चर्चा आहे. एवढंच नाही तर, मनसेच्या युतीसाठी दिल्लीवरून सूत्र हलवले जात असल्याचेही सांगितले जात आहे. तर, या भेटीतून आता काय साध्य होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. (BJP Manse Yuti)
Hemant Godse Accident | नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा भीषण अपघात
BJP Manse Yuti | काय म्हणाले आशिष शेलार..?
या भेटीवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले की,”साथ वगैरेचा काही प्रश्न नाही आम्ही राजकीय मित्र असून, आम्ही भेटत असतो. मनसे भाजप युतीबाबत चर्चा झाली का?, यावर शेलार म्हणाले की, “मन की चर्चा झाली, जन की बात” झाली आहे. राजकरणात अशा भेटीगाठी होत असतात, आणि चर्चाही होत असतात. अजून कुठलाही राजकीय निर्णय घेतलेला नाही, योग्य वेळी याबाबत चित्र स्पष्ट होईल. सध्या मी मनसेबाबत काहीच बोलणार नाही, योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल’, असं सूचक वक्तव्य आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.(BJP Manse Yuti)
Trunmul Congress | पक्ष कार्यालयात महिलांवर अत्याचार; आरोपी नेता फरार
काय म्हणाले राज ठाकरे..?
दरम्यान, आजच्या या भेटीवर आणि महायुतीत सामील होण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना राज थकरे हे काहीशी सावध भूमिका घेताना दिसले. राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. मात्र, पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी प्रश्नाचे उत्तर न देता मौन बाळगले आणि सावध प्रतिक्रिया दिली असून, “वेळ आल्यावर सगळं चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी युतीच्या चर्चा फेटाळल्याही नसल्याने यावरून आता राजकीय चित्र रंगवले जात आहे. तर, आगामी काळात मनसेदेखील महायुतीत सामील होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली असून, राज थकरे महायुतीत आल्यास या राजकारणाच्या चिखलात मनसेचीही चाकं रुतणार का? हे पहावे लागणार आहे. (BJP Manse Yuti)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम