किशोर चव्हाण यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

0
28

देवळा ; येथील भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . रविवारी दि १७ रोजी नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत . त्यात भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तालुक्यातील वरवंडी येथील किशोर चव्हाण यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे .

किशोर चव्हाण यांनी भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस,भाजपा जिल्हा चिटणीस, तालुकाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी विविध पदे भुषविले भूषविले आहेत . पक्षाच्या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलने केली असून , पक्ष वाढीसाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत . पक्षश्रेष्ठीनी चव्हाण यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा उपाध्यक्ष पदी नेमणूक केली आहे .

चव्हाण यांच्या नियुक्तीचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार,आ.डॉ.राहुल आहेर,भाजपा जिल्हा नेते केदा आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, भास्कर पवार, शहर अध्यक्ष अतुल पवार, हर्षद मोरे,माजी तालुका अध्यक्ष सुनिल देवरे,भाऊसाहेब आहेर,संजय कानडे,सोपान सोनवणे, शंकर निकम,मनेश ब्राह्मणकार,दिपक जाधव,दिनेश मोरे,विजय आहेर,पवन अहिरराव, उप सरपंच जगदिश शिंदे,भिला आहेर, सुनिल सावंत,दिलिप जोंधळे आदींनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here