BJP | भारती पवारांवर आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

0
28
BJP
BJP

BJP | काल शुक्रवार (दि. 26) रोजी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश माधव बर्डे या पदाधिकाऱ्याने दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार आणि महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यावर आणि त्यांच्या स्वीय्य सहाय्यकांवर पुढील काही गंभीर आरोप केले होते. (BJP)

  1. मा. मंत्री महोदयांना थेट संपर्क होत नाही, फोन कॉल नेहमी divert / forwarded असणे.
  2. पदाधिकारी अथवा कार्यकर्ते कुठल्याही कामासाठी गेले असता पी.ए.ना मध्यस्थी टाकणे व कुठल्याही विकास कामांसाठी आर्थिक मागणी करणे.
  3.  सर्वसामान्य लोकांची कामे घेवून गेला असता अधिकाऱ्यांना थेट फोन न लावणे. तुम्ही तेथे जा व माझ्या पी.ए.ला फोन जोडून या अशी उत्तरे देणे.
  4. अनेक सामान्य मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना वैयक्तिक अथवा शासकीय कामांसाठी शिफारस पत्र न देणे.
  5. माझ्याकडे वैयक्तिक कामे घेवून यायची नाही अशी उर्मटपणे उत्तरे देणे.
  6. ऑफिसला पी.ए. लोकांची मंत्री महोदयांच्या अनुपस्थितीमध्ये तेथे येणाऱ्या लोकांना उध्दट उत्तरे देणे व कुठल्याही कामासाठी आर्थिक मागणी करणे.  (BJP)

Bharati Pawar | टक्केवारीची मागणी, धमकी; भारती पवारांवर कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप..?

BJP | जिल्हाध्यक्षांचे स्पष्टीकरण 

दरम्यान, यानंतर भारतीय जनता पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी या पदाधिकाऱ्याची पक्षाच्या पदावरून हाकालपट्टी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश माधव बर्डे या पदाधिकाऱ्याने ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाला व संबंधित लोकसभेच्या उमेदवाराला वेठीस धरण्याचे काम केले आहे. त्याने पक्ष विरोधी भूमिका घेऊन, कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.(BJP)

त्याने राजीनामा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत अतिशय बालिशपणाचे प्रदर्शन केले असून, याप्रकारे पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्याला पक्षाच्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. आतापर्यंत अनेक वेळा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकऱ्यांकडून वेळोवेळी समज दिली गेली. मात्र, तरीही त्याच्याकडून पक्षविरोधी भूमिका चालू ठेवल्या गेल्या. त्यामुळे कठोर निर्णय घेत त्याला भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदावरून या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे सुनील बच्छाव यांच्या नावाचे पत्र हे सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. (BJP)

Nashik Lok Sabha | नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट; भुजबळांची तिरकी राजकीय चाल..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here