नाशिक प्रतिनिधी – आदिवासी समाजबांधवांनी एकत्र येत सर्वांना कमी दरात आरोग्यसेवा देण्याचे ध्येय ठेवत आदिवासी समाजाचा जागतिक स्तरावरील पहिला सामाजिक उपक्रम असलेल्या ‘बिरसा मुंडा मेडिकल हब’चे उद्या (दि. ७) जागतिक आदिवासी दिनी लोकार्पण सोहळा होणार आहे.
शहरातील म्हसरूळ भागात किशोर सूर्यवंशी मार्गाजवळ बिरसा मुंडा मेडिकल फाउंडेशनतर्फे उभारलेल्या या १०० खाटांच्या सुसज्ज हॉस्पिटलचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी ह्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा रविवारी (दि. ७) पार पडणार आहे.
बिरसा मुंडा मेडिकल हबमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा अगदी माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार असून रुग्णवाहिकेसह २४x७ अपघात विभाग, अत्याधुनिक रेडीओलॉजी विभाग व प्रयोगशाळा, ३० आय.सी.यू. बेडसहित १५ बेड्सचे लहान मुलांचे आय.सी.यू. विभाग आदि सुविधा असणार आहेत.
दरम्यान, जागतिक आरोग्य दिनानिमित्त संस्थेद्वारे विशेष आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. ह्या शिबिरात माफक दरात सर्व रोगांवर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार होणार आहे. उद्यापासून शिबिराची नोंदणी सुरु होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम