Skip to content

बिग बॉस मराठीचे चाहते आहात ना ! मग हे विनोदी मीम्स तुम्हाला नक्कीच आवडतील


क्षितीज लोखंडे, द पॉईंट नाऊ

‘बिग बॉस मराठी’ हा वादग्रस्त, पण तितकाच लोकप्रिय शो सुरु होऊन अवघे काहीच दिवस झाले आहे. या शोमध्ये १६ सेलिब्रेटी एका घरात  तब्बल १०० दिवस राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

आता तिकडे या स्पर्धकांनी घरात पाऊल ठेवताच जोरदार राडे घालण्यास सुरुवात केली आहे. तर काही स्पर्धक प्रेक्षकांचे माने जिंकत आहे. त्यामुळे हा शो रसिकांच्या पसंतीस पडत आहे. तिकडे टीव्हीवर त्यांचे वाद-विवाद भागात असताना दुसरीकडे सोशल मिडीयावर अनेक मीमर मंडळी आपल्या मीमच्या माध्यमातून नेटकऱ्यांचे जोरदार मनोरंजन करत आहे. पाहूयात हे भन्नाट व विनोदी मीम्स : (all pics by instagram)

शोच्या पहिल्या दिवसापासून अपूर्व नेमळेकर घरातल्या सदस्यांशी नेहमी वाद घालत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच तिने बऱ्याचदा अन्य स्पर्धक प्रसाद जावदेशी वाद घालताना हातवारे केले असून, अनेकांनी तिच्या घरातील वर्तणुकीवर टीका केली आहे. त्याचा प्रत्ययही ह्या मीममधून दिसून येत आहे. (cr. @ppm_memesandvines)

ह्या शोमध्ये त्रिशूळ मराठे हा नाशिककर सहभागी असून तो या घरात जाणारा सामान्य नागरिक म्हणून निवडला गेला आहे. पण त्याने पहिल्याच एपिसोडमध्ये एकाशी वाद घालताना ‘नाशिक’ चा ‘नासिक’ असा उल्लेख केल्यामुळे एक नाशिककर आपला राग व्यक्त करत असल्याचे या मीममध्ये दिसत आहे. (cr. @kshitijntr033)

अभिनेत्री व आरजे अमृता देशमुख हीदेखील यात सहभागी असून ती आपल्या चेहऱ्यावरील हावभावाने रसिकांना मोहित करते. ते ह्या मीममध्येही दिसून येत आहे. (cr. @sanskari_tales)

तसेच, हिंदी मालिकेतील अभिनेत्री यशश्री मसुरकर हिच्यावरही अनेक विनोदी मीम्स सध्या व्हायरल होत आहे.(cr. @shitmarathiserialsshow)

घरात असा एकही दिवस नाही, की जिथे भांडण होत नाही. कारण घर म्हटलं की, भांड्याला भांडं लागतच. पण बिग बॉसच्या घरात भांडण हीच मुख्य गोष्ट असल्याने एक बिग बॉसचा चाहता आपल्या भावना यातून व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे, यंदाचं पर्व हे “ऑल इज वेल” म्हणून सुरुवातीला म्हटला जात होता, पण आताची भांडणे बघून अनेक जण “ऑल इज नॉट वेल” असेच म्हणत आहे. (cr. @litmarathi2.0)

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!