Bhaskar Bhagare | आरोग्यमंत्री पण एक हॉस्पिटलही उभारता आले नाही; भगरेंचा पवारांना टोला

0
21
Bhaskar Bhagare
Bhaskar Bhagare

Bhaskar Bhagare |  आज नाशिकमध्ये तीन दिग्गज नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून, आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पिंपळगाव येथे पार पडली. त्यानंतर आता वणी येथे भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवार प्रचार सभा घेत आहेत. या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित अहते.

दरम्यान, या सभेत राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी मतदारांना आव्हान केले. “राज्यात आणि देशात भाजप सरकार आहे. पण तरीही कुठलेही ठोस काम करण्यात आलेले नाही. माझा मतदार संघ हा आदिवासी बहुल मतदार संघ असून, येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. येथे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम वहिनी नद्यांचा प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल.

खासदारांनी कांदा प्रश्नी संसदेत शब्दही काढला नाही

गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे मतदार संघाचे नुकसान जाहले आहे. पण कोणी बघायलाही आले नाही. आम्ही पाच वर्षांपूर्वी निवडून दिलेल्या खासदारांनी कांदा प्रश्नी संसदेत शब्दही काढला नाही. मात्र, आमच्या सुप्रिया ताई आणि अमोल कोल्हे यांनी कांदा प्रश्नी संसदेत आवाज उठवला. गेल्या काही दिवसांपुर्वी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली. मात्र, ही निर्यात बंदी अशी उठवली की, एखाद्या माणसाचे पाय बांधून त्याला पाळायला पाठवले अशा प्रकारे हि कांद्यावरील निर्यात बंदी खुली केली. तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला काही फरक पडला नाही.

PM Modi In Nashik | आमच्या काळात सर्वाधिक कांदा निर्यात; माझे शेतकरी मला विसरणार नाही

आरोग्य मंत्री पद मिळाले, पण काहीही करता आले नाही 

आम्ही निवडून दिलेल्या खासदाराला केंद्रात केंद्रीय आरोग्य मंत्री पद मिळाले. आम्हाला वाटले एक महिला आहेत. डॉक्टर आहेत, त्यामुळे अपेक्षा होत्या. मात्र, त्यांना पाच वर्षात काहीही करता आले नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांना एकही हॉस्पिटल उघडता आले नाही किंवा एकही मेडिकल कॉलेज त्यांना उभारता आले नाही. जे उपजिल्हा रुग्णालये आहेत. त्यांचीही अवस्था एवढी बिकट आहे की, तिथे डॉक्टरांचाच पत्ता नाही.

Bhaskar Bhagare | माझी कुवत नव्हती पण… 

माझी कुवत नव्हती. पण तरीही आपण माझ्यावर विश्वास टाकला. हे उपकार जीवात जीव असे पर्यंत मी विसरणार नाही. तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशा शब्दांत भास्कर भगरे यांनी आभार मानले.

Bharti Pawar | बहिणीवरचा राग नंतर काढा, कामांची यादीही वाचली; भारती पवारांची भावनिक साद


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here