Bharti pawar | एक रुपयाचेही कर्ज नाही, संपत्तीत दुपटीने वाढ; एकूण संपत्ती किती..?

0
16
Bharati Pawar
Bharati Pawar

Bharti pawar |  दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha) महायुतीकडून भाजपने दुसऱ्यांदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Bharti pawar) यांना उमेदवारी दिली आहे. नाशिकच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काल नाशिक आणि दिंडोरीच्या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. आतापर्यंत या मतदारसंघातून नऊ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, भाजपच्या भारती पवार, शरद पवार गटाचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagare), माकपचे जे पी गावित (J P Gavit), वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल (Malati Thavil), आणि भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) या उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. बंडखोरी करत काल चव्हाण यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने भारती पवारांची वात आता खडतर झाल्याचे दिसत आहे. कारण २०१४ च्या निवडणुकीत याच हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारती पवारांचा पराभव केला होता. (Bharti pawar)

Bharti Pawar | भारती पवारांना नेटकऱ्यांचा कुठे विरोध तर कुठे पाठिंबा..?

Bharti pawar | भारती पवारांच्या संपत्तीत दुपटीने वाढ

दिंडोरीच्या विद्यमान खासदार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवारांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती नुमद केली आहे. यानुसार गेल्या पाच वर्षात भारती पवार आणि त्यांचे पती प्रवीण पवार यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांच्या नावावर एकूण 83 लाखांची मालमत्ता होती. मात्र, आता त्यांची एकूण मालमत्ता ही 2 कोटी 13 लाख इतकी आहे.(Bharti pawar)

Bharati Pawar | टक्केवारीची मागणी, धमकी; भारती पवारांवर कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप..?

एक रुपयाचेही कर्ज नाही 

मागील निवडणुकीत डॉ. भारती पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचीएकूण संपत्ती ही 13 कोटी इतकी होती. तर, स्वतः डॉ. भारती पवार यांच्या नावे 53 लाख 42 हजारांची जंगम मालमत्ता होती. जी आता 63 लाख इतकी आहे. तर गेल्या निवडणुकीत 30 लाखांची स्थावर मालमत्ता ही आता दीड कोटी झाली आहे.

यात डॉ. भारती पवारांकडे साडेपाच लाख रुपये किंमतीचे 80 ग्रॅम सोने आहे. एक लाख आठ हजार रुपये किंमतीची दीड किलो चांदी, विविध बँकांमध्ये सोळा लाख रुपयांच्या ठेवी, दहा लाखांचा विमा, बँक ऑफ बडोदाचे नऊ लाखांचे शेअर्स त्यांच्याकडे असून, विशेष म्हणजे त्यांवर एक रुपयांचेही कर्ज नाही. हे त्यांनी प्रतिज्ञापत्रकात नमूद केले आहे. तर, भारती पवार यांचे त्यांचे पती प्रवीण पवार यांच्या नावावर एक कोटी सहा लाख किंमतीची जंगम मालमत्ता, 19 कोटी 34 लाख 81 हजार किंमतीची स्थावर मालमत्ता असून, त्यांच्यावर पावणेतीन लाखांचे कर्ज आहे. (Bharti pawar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here