Bharti Pawar | खर्चात भारती पवारांचीच आघाडी; निवडणुकीवर आतापर्यंत इतका खर्च..?

0
20
Bharti Pawar
Bharti Pawar

Bharti Pawar | गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला राजकीय रणसंग्राम आता अखेरच्या टप्प्यात आला असून, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर, अवघ्या दोन दिवसांत आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या दिंडोरी डॉक्टर आणि शिक्षक यांच्यात ही लढत पाहायला मिळत आहे. यात विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांनी मतदार संघात प्रचारासाठी जंग जंग पछाडले. दरम्यान, निवडणूक खर्चातही डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी आघाडी घेतली असून, १४ मे पर्यंत त्यांनी एकूण २५ लाख रुपये इतका खर्च प्रचारावर केला आहे.

Bharti Pawar | बहिणीवरचा राग नंतर काढा, कामांची यादीही वाचली; भारती पवारांची भावनिक साद

Bharti Pawar | उमेदवारांचा खर्च.. 

तर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी १७ लाख रपये इतका खर्च केला आहे. (Nashik Lok Sabha Constituency) निवडणूक आयोगाने २० मे रोजी मतदान झाल्यानंतर २२ मे रोजी उमेदवारांना निवडणुकीतील संपूर्ण खर्च सादर करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तर, नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च ताळमेळ बैठक झाली.(Bharti Pawar)

Bharti Pawar | गेल्या निवडणुकीत चव्हाणांनी ताकद लावली; आता त्यांनाच बाजूला केल्याने कोण तारणार..?

या बैठकीत सदर तपासणीनंतर निवडणूक आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर दहा उमेदवारांचा प्रचार खर्च अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात ही माहिती देण्यात आली आहे. (latest marathi news) दरम्यान, या उमेदवारांच्या तिसऱ्या खर्च तपासणीसाठी सहाय्यक नोडल अधिकारी बाबासाहेब शिंदे, क्षेत्रीय नोडल अधिकारी गोविंद कतलाकुटे, लेखांकन चमू नियंत्रक जलपत वसावे, सहाय्यक खर्च निरीक्षक (मुख्यालय) प्रसाद कुलकर्णी यांच्यासह लेखा अधिकारी राजेंद्र कोठावदे, लखीचंद बाविस्कर, खलील पटेल, नितीन नंदन, संतोष नायर, अनिल उमरे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.(Bharti Pawar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here