Bharti Pawar | बहिणीवरचा राग नंतर काढा, कामांची यादीही वाचली; भारती पवारांची भावनिक साद

0
63
Bharti Pawar
Bharti Pawar

Bharti Pawar | आज महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार, आणि धुळे लोकसभेचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज पिंपळगाव येथे आयोजित केली आहे. यावेळी बोलताना भारती पवार यांनी मतदारांना राग रूसवे आणि नाराजी विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मतदान करा.

कामांची यादीच वाचली… 

कोरोना काळात सिविल हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर सेंटर तयार केले. ६० वर्षात आदिवासी भागाचा कोणी विचार केला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून माझ्या मतदार संघातील आदिवासी भागात पाच ठिकाणी एकलव्य मॉडेल स्कूल तयार केले. आम्ही गेल्या पाच वर्षात १८०० कोटींचा निधी आम्ही आणू शकलो ते आमचे हक्काचे सरकार होते त्यामुळेच.

महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात मदत केली. दिंडोरी लोकसभा मतदार संघात नारपार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती की त्यांनी या कार्याला गती द्यावी. वेगवेगळ्या योजनांतून मतदार संघातील ग्रामीण भागांचा विकास झाला.

Nashik News | व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या ॲडमिन्सलाही नोटिस; १५ शेतकरी आंदोलक ताब्यात

आम्ही राज्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना कांदा अनुदान दिले

५ वर्षापासून आमचं सरकार कांदा प्रश्नावर काम करतंय. नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पीकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे ड्रायपोर्टला मंजूरी दिली असून, यासाठी निफाडमध्ये १०७ एकर जागा खरेदी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात कांदा आणि द्राक्ष निर्यातीसाठी प्रयत्न केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी कांद्याला अनुदान दिले. आम्ही नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान दिले. ‘वन टाइम सेट्टलमेंट’द्वारे शेतकऱ्यांना मोठी मदत झाली.

मोदी का हवे..?

  1. जलजीवन मिशनच्या माध्यमातून अडीच लाख कनेक्शन
  2. स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख शौचालय
  3. २१ लाख कुटुंबांना राशन दिले.
  4. ९५ हजार घरकुल मंजूर केले.
  5. उज्ज्वला योजनेंतर्गत आदिवासी भागात पहिल्यांदा गॅस सिलेंडरचा लाभ झाला.
  6. १७५ किलोमीटर रस्त्याचे काम मतदार संघात झाले.
  7. स्वयं रोजगार योजनेंतर्गत ४५ हजार युवकांना प्रशिक्षण.

Nashik Loksabha | दिग्गजांच्या तोफा नाशकात धडाडणार; याचा उमेदवारांना फायदा होणार..?

Bharti Pawar | भारती पवारांचे भावनिक आवाहन

माझ्यावर तुमचा राग असेल. लोक म्हटलं असतील की, ताई गावात कधी आल्या नाहीत. त्यामुळे तुमचा राग असेल. पण मी विकास कामांमध्ये कधी कमी पडली नाही आणि कधी कमी पडणारही नाही. ही निवडणूक राग रूसव्याची नाही. माझ्यावरील तुमचा राग नंतर व्यक्त करा. पण मतदानातून नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभे रहा. या बहिणीला पुन्हा साथ द्या. विकास कामांसाठी कमी पडणार नाही. राग रूसवे नंतर काढा,असे भावनिक आवाहन भारती पवारांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here