Bharti Pawar | दिंडोरी लोकसभा मतदार संघातून २०१४ च्या निवडणुकीत भारती पवार यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. तर, २०१९ च्या निवणुकीत नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि चव्हाण यांना डावलून भाजपने भारती पवारांना (Bharti Pawar) उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या.
Bharti Pawar | भाजप सरकारकडून मोठ्ठे गिफ्ट
भारती प्रवीण पवार (Bharti Pawar) या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार होत्या आणि त्या स्वतःही पेशाने डॉक्टर असल्याने त्यांना भाजप सरकारने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचे मोठ्ठे गिफ्ट दिले. मात्र, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असूनही भारती पवारांनी (Bharti Pawar) काही किरकोळ कामे वगळता मतदार संघात कुठलीही लक्षणीय आरोग्यविषयक कामे आणली नाहीत किंवा त्यासाठी काही कठोर भूमिकाही घेतली नाही. गेल्या पाच वर्षात खासदारकी, केंद्रात सत्ता, केंद्रीय राज्यमंत्री पद एवढं सगळं असूनही त्यांना मतदार संघात म्हणावे असे फारकाही करता आले नाही.
Bharti Pawar | भारती पवारांची सभा उधळली..?; कांदा उत्पादकांसह गावकरी आक्रमक
…अन् तेव्हा मतदार संघातील खरी परिस्थिती समोर आली
दरम्यान, खरी हद्द तर तेव्हा झाली जेव्हा चांदवडच्या राहुड घाटात एसटी अपघात झाला अनेकांनी जीव गमावला तर, कित्येक लोक जखमी होते. या जखमींना तत्काळ उपचाराची गरज होती त्यामुळे त्यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, तेथे डॉक्टरांचाच पत्ता नव्हता. तातडीने त्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात आणि नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, आमदार डॉक्टर, खासदार डॉक्टर आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून त्यांच्याच मतदार संघात आरोग्यसेवेचा हा असा मनमानी कारभार त्या दिवशी प्रकर्षाने उघड झाला.
Bharti pawar | एक रुपयाचेही कर्ज नाही, संपत्तीत दुपटीने वाढ; एकूण संपत्ती किती..?
केंद्रीय राज्यमंत्री पद असून मतदार संघासाठी काय केले..?
तसेच यामुळे डॉक्टर आमदारांच्या आणि खासदार डॉक्टर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदार संघातील खरी परिस्थिती लोकांसमोर आली. ही परिस्थिती केवळ चांदवडच नाहीतर नाशिकच्या ग्रामीण भागात सर्वत्र आहे. त्याचमुळे विद्यमान खासदारांनी गेली पाच वर्षे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पद असताना नेमके काय केले..? असा प्रश्न आता मतदार संघातून उपस्थित होत आहे आणि प्रचाराला गेल्यावर जागोजागी याबाबत त्यांना जाबही विचारले जात आहे. (Bharti Pawar) गेल्या पाच वर्षात मतदार संघात कुठली लक्षणीय आरोग्य सेवा आणली गेली किंवा आरोग्यसेवेसाठी काय विशेष कामे करण्यात आली..? त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता नागरिकांचा रोष आणि संताप हा रास्तच असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम