Bharti Pawar | सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, सगळीकडे उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवले आहे. भर उन्हात गावोगावी खेडोपाडी जाऊन उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मिडियावरही प्रचार सुरू केला आहे. यामुळे आता सोशल मिडियाही प्रचाराचे मैदान बनले आहे. मात्र, या उमेदवारांच्या कमेंट्समध्ये मतदार आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. (Bharti Pawar)
यंदा बहुतेक ठिकाणी भाजपने विद्यमान खासदारांनाच संधी दिली असून, या लोकप्रतिनिधींचे काम न आवडल्याने अनेक गावांत मतदार लोकप्रतिनिधींना विरोध करताना दिसत आहे. अशीच परिस्थिती निर्माण झालीय दिंडोरी लोकसभा मतदार संघात. येथे पुन्हा एकदा भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना संधी दिली असून, त्यांना मात्र मतदार संघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. (Bharti Pawar)
Bharati Pawar | भाजपा खासदार डॉ. भारती पवार यांना गावबंदी
Bharti Pawar | 2019 ला आम्हाला अक्कल नव्हती, 5 वर्ष दिसला नाही..
नुकतंच काही दिवसांपूर्वी देवळ्यातील एका गावात त्यांना गावबंदी करण्यात आल्याच्या ठरावाचे पत्रक सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, भारतीताईंच्या विरोधातील भावना नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर उतरवायला सुरुवात केली. त्यांच्या इंस्टाग्रामवरील प्रत्येक पोस्टच्या कमेंट्समध्ये त्यांना विरोध करताना आणि त्यांच्या विरोधात कमेंट्स करताना दिसत होते. त्यामुळे वैतागून की काय, भारती पवारांच्या इंस्टाग्रामवरील कमेंट्सच बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 15 एप्रिलनंतरच्या पोस्टच्या कमेंट्स बंद करण्यात आल्या आहेत. (Bharti Pawar)
यात जिल्ह्यातील तरुण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून, “2019 ला आम्हाला अक्कल नव्हती. त्यामुळे आम्ही भाजपला मतदान केले. पण आता करणार नाही, 5 वर्ष नाही दिसला तुम्हाला तुमचं मतदार संघ परिवार म्हणून, निवडणूक आली तेव्हा परिवार दिसायला लागला.” अशा कमेंट्सद्वारे तरुणांनी आपला रोष व्यक्त केला आहे. त्यामुळेच इतर मतदारांवर याचा परिणाम होऊ नये म्हणून नेटकऱ्यांच्या भीतीने भारती पवारांनी त्यांच्या कमेंट्सच बंद केल्या असाव्यात.
सर्व्हेमध्ये सकारात्मक मग कमेंट्स का नकारात्मक..?
एकीकडे इंस्टाग्रामवर विरोध होत असताना दुसरीकडे फेसबूकवर मात्र, त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यामुळे एकूणच भारती पवारांना सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, सर्व्हेमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचा दावा करणाऱ्या भारतीताईंवर अचानक कमेंट्स बंद करण्याची वेळ का आली..?, ही विचार करण्यासारखी बाब आहे. दरम्यान, कांदा निर्यात बंदी, कांद्याचे पडलेले दर यावर त्यांनी केंद्रात आवाज न उठवल्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविरोधात नाराजी असून, ही नाराजी तरुण मतदारांनी सोशल मिडियावर उतरवली आहे. मात्र, ही नाराजी मतपेटीत उतरल्यास भारती पवारांसाठी ही निवडणूक अवघड होईल यात शंकाच नाही. (Bharti Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम