Fraud : पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने कोट्यावधींची फसवणूक ; भंडारा पोलिसांनी केली दोषींवर कारवाई.

0
9

महिनाभरात पैसे दुप्पट करून देत असल्याची बतावणी करून सर्वसामान्यांना लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ऑनलाइन बोरा ट्रेडिंग अँपवर भंडारा पोलिसांची कारवाई. एकाला अटक, एक फरार झाला आहे.

भंडारा पोलीसांनी क्रिप्टो करन्सीच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बोरा बँड या ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या पीडित आणि आरोपींचा शोध घेत आहेत. ३० दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासन देऊन इंटरनेटच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या बोरा बॅण्डने भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली आहे. एकट्या भंडारा शहरात ऑनलाईन बोरा बँडच्या प्रलोभनाला बळी पडलेल्यांची संख्या 500/1000 पेक्षा जास्त आहे.  ज्यांनी या योजनेत पैसे गुंतवले असतील अश्यांची माहिती पोलीस घेत असून बोरा बँडचा प्लॅटफॉर्मही बंद करण्यात आला आहे.

बोरा ब्रँड मध्ये किती पैसे गुंतवण्यात आले आहेत याची निश्चित रक्कम पोलिसां अजून समजली नसून ही रक्कम करोडोंच्या घरात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

एसपी लोहित मतानी यांनी सांगितले की, भंडारा येथे गेल्या काही दिवसांपासून नेटवर्किंग, होम मीटिंग, सेमिनार आणि एजंटच्या माध्यमातून लोकांना ३० दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून बोरा ब्रँड ट्रेडिंग अँप वर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जात होते. यामध्ये गुंतवणूकदारांना काही काळासाठी पैसे परत केले जातात.परंतु नंतर साइट किंवा अँप बंद होते. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळत नव्हते.

या संदर्भात विद्यानगर येथील रहिवासी गुंतवणूकदार पवनकुमार मस्के यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.विक्की झाडे रहाणार आंबेडकर वार्ड भंडारा याच्यासह किशोर कुंभारे (46, रा. टाकिया वॉर्ड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर कुंभारे याला अटक करण्यात आली असून, विकी झाडे याचा शोध सुरू आहे.

क्रिप्टो करन्सी बोरा बँड आणि तत्सम काही प्लॅटफॉर्म क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत आहेत. लोकांनी त्यांच्या फंदात पडू नये. तुमचे पैसे काढून घ्या आणि फसवणूक झाली असल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती द्या अस आवाहन पोलिसांनी केलं आहे.

लोहित मतानी – एसपी भंडारा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here