Nashik : नाशकात 40 हुन अधिक ठिकाणी पार पडली सामूहिक नमाज…

0
42

Nashik : आज बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता कायम राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभा राहिलं होतं मात्र पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे नाशिकमध्ये शांततेत दोनही सण पार पडले आहेत.

नाशिक शहर परिसरातील मुस्लिम बांधवांनी पवित्र ‘ईद -उल- अजहा’ हा आपला मोठा सण उत्साहात साजरा केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाऊस पडत असताना देखील ऐतिहासिक शहाजानी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले आहे. यावेळी देशात शांतता प्रस्थापित व्हावी, प्रत्येकाचे कल्याण व्हावे तसेच सर्व प्रकारचे आजार दूर व्हावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली आहे.

नाशिक शहरामध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त मशिदी आहेत या सर्वच ठिकाणी सामुदायिक नमाज पठण करण्यात आले इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरु हजरत इब्राहिम अलेह सलाम व हजरत इस्माईल अलेहसलाम यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ ईद-उल-अजहा हा पवित्र सण साजरा केला जातो. खतीब -ए- नाशिक हाजी हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी यावेळी नमाजचे नेतृत्व केले. तत्पूर्वी मौलाना महबूब आलम यांनी इस्लाम धर्म तसेच ईदचे महत्व विशद केले.

 

यावेळी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी नाशिकचे पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह आदी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंडप उभारण्यात आला होता, उपस्थित भविकांना पुष्पगुच्छ देण्यात आले. तर ईद च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने ईदगाह मैदानावर डागडूजी देखील करण्यात आली होती.

 

दोन रकात वाजीब नमाज पार पडल्या नंतर मैदानावर उर्दू भाषेत खतीब साहेब यांनी “खुत्बा’ चे वाचन केले. यानंतर विशेष दुवा देखील करण्यात आली. तसेच या दुवानंतर सर्वांनी मोठ्या आदबीने उभे राहून सलातोसलामचे वाचन केले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here