मुंबई : फडणवीसांना कोणता जादू येतो हे आता म्हणायची वेळ आली आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधान परिषद निवडणुकीतही दाखवून दिली अशक्य असलेला पाचव्या जागेवरील विजयश्री खेचून आणला आहे. महाविकास आघाडीची तब्बल २० मत फोडत भाजपचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाडही विजयी झाले आहेत. लाड यांना पहिल्या फेरीत १७ मत मिळाली. तर दुसऱ्या फेरीत भाजपच्या पहिल्या फेरीतील १२ मत लाड यांना ट्रान्सफर झाल्याने लाड दुसऱ्या फेरीत विजयी झाले.
फडणवीस यांनी कमाल केली असून भाजपच्या पहिल्या चार उमेदवारांमध्ये श्रीकांत भारतीय यांना ३०, राम शिंदे यांना ३०, प्रविण दरेकर यांना २९ तर उमा खापरे यांना २७ मत मिळाली. विजयाच्या २६ मतांचा कोटा वगळून यातील उरलेले १२ मत दुसऱ्या फेरीत लाड यांना वर्ग झाली व त्यांनी २६ मतांचा आवश्यक कोटा पूर्ण करत विजय मिळवला. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी मतमोजणीपूर्वी केलेला दावा खरा ठरवत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत
पहिल्या फेरीत भाजपचे प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे विजयी झाले तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसेही विजयी झाले असून काँग्रसेच पहिल्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप हे देखील दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर यांना २९, राम शिंदे यांना ३०, श्रीकांत भारतीय यांना ३० आणि उमा खापरे यांना २७ मत मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनाही प्रत्येकी २६ मत मिळाली आहेत. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांना पहिल्या पसंतीची २८ मत मिळाली. तर खडसे यांना २९ मत मिळाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम