भगूरला नव्याने ग्रामीण रुग्णालय उभारण्यास मान्यता !

0
22

नाशिक प्रतिनिधी :  नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे गाव म्हणून ओळखले जाणारे  भगूर  येथे नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने  दि 17 रोजी  यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.

येथील  लोकप्रतिनिधींंनी भगूर येथे ग्रामीण रुगणालय उभारण्याची वारंवार मागणी केली होती. राज्य सरकारने या मागणीची दाखल घेत त्याला मंजुरी दिली आहे.रुग्णालयाच्या पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल तसेच  ग्रामीण रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा उपलब्ध करून बांधकाम करण्यासाठी अंदाज आराखडा तयार करून तो प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात यावा. असे आदेश काढण्यात आले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here