जिल्ह्यातील चौघा शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

0
48

देवळा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राज्य स्तरावरचा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्ष्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक जिल्ह्यातून हंसराज देसाई, सिद्धार्थ सपकाळे, साहेबराव गुंजाळ व संगीता बाफना या चौघा शिक्षकांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगलप्रसाद लोढा, शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षण सचिव रंजितसिंग देवोल, शिक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, कृष्णकुमार पाटील, शरद गोसावी, कैलास पगारे, रमाकांत काठमोरे यांसह राज्यातील शिक्षण उपसंचालक व विविध मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने रुग्णालयातून शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी निवडणुकीच्या कामासाठी मेघालय येथे उपस्थित असल्याने ऑनलाईन उपस्थित रहात पुरस्कारार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्यात.

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण आज मुंबईतील बांद्रा स्थित रंगशारदा सभागृहात संपन्न झाले.
सध्याच्या युगामध्ये शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या बरोबरीने गतिमान होणे आवश्‍यक आहे. काळानुरूप झालेले बदल स्वीकारून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायला हवे. अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली.

दापुरे ता मालेगाव येथील हंसराज देसाई, आदिवासी शिक्षक विभागातुन टिटोली ता इगतपुरी सिद्धार्थ सपकाळे, वासाळी ता नाशिक येथील साहेबराव गुंजाळ यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार तर माध्यमिक शिक्षक गटातून चांदवड येथील संगीता बाफना यांना अशा चौघा शिक्षकांना पर्यटनमंत्री मंगलप्रसाद लोढा कपिल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आज झालेल्या कार्यक्रमात राज्यातील ३८ प्राथमिक शिक्षक,३९ माध्यमिक शिक्षक,१८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक,८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका,दोन कला,क्रीडाविशेष शिक्षक व १ अपंग शिक्षक,अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व १ गाइड शिक्षक व १ स्काउट शिक्षक अशा १०८ शिक्षकांना ह्या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देत गौराविन्यात आले. स्मृतिचिन्ह ,प्रशस्तिपत्रक व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

आयुष्यात शिक्षक म्हनून काम करतांना पुरस्कारासाठी न काम करता प्रामाणिक पणे काम केल्याचेच हे फळ असून पुढील सेवा काळात विध्यार्थी हिताचे उपक्रम शाळा स्तरावर राबवणार आहे व सतत विध्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करत राहीन.
सिद्धार्थ सपकाळे, इगतपुरी

वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिलांना दरमहा ग्रामपंचायत स्तरावरून सन्मानित करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here