शेताची राखण करण्यासाठी मचाणवर जाताय तर सावधानता बाळगा ! वाचा सविस्तर

0
19

द पॉइंट नाउ प्रतिनिधी : शेत पिकांच्या रक्षणासाठी शेतकरी धडपड करतो आहे. यासाठी शेतामध्ये मचाण उभी केली जाते. ही मचाण सुरक्षित असते. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या ह्या घटनेने शेतकरी घाबरून गेले आहेत. ही घटना राजुरा तालुक्यामधील सूब्बई गावात घडली आहे. पिकांवर देखरेख ठेवण्याकरिता मचाणीवर चढलेल्या भीमा घोगलोत नावाच्या शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील थोमापूर येथील भीमा घोगलोत हे नेहमीप्रमाणे शेतात पीकाचे रक्षण करण्यासाठी गेले होते. शेतातील मचाणीवर बसून ते जाग राहून शेत राखत होते. अशात बिबट्याने थेट मचाण गाठून शेतकऱ्यावर हल्ला केला. शेतकऱ्याला लांब फरफटत नेले. ओरडण्याचा आवाजाने इतर शेतकरी धावत आले. त्यानंतर चे दृश्य पाहून शेतकरी हादरले आहेत.

बिबट्या शेतकऱ्यास ओढून नेत होता आणि बाकीचे शेतकरी मात्र काहीही करू शकले नाहीत. या हल्ल्यात शेतकरी भीमा यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती वनकर्मचाऱ्यांना देण्यात आली. सुब्बई, चिंचोली, अंतरगावचे वनरक्षक व इतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या घटनेने शेत राखण करणारे शेतकरी धास्तावले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्षाने टोक गाठले आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये रोजचे बळी चालले आहेत. वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here