जिल्ह्यात कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बिगुल वाजले ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

0
18

नाशिक : राज्यात सध्या निवडणुकांचे वातावरण असून शेतकऱ्यांचा आत्मा म्हणून बघितलेल्या जाणाऱ्या बाजार समितीत देखील गुलाल उधळणार असून इच्छुकांनी कंबर कसली आहे. शेतकऱ्यांचे लक्ष लागलेल्या जिल्ह्यातील एकूण 14 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुकांचे रणशिंग आज फुंकले आहे. या निवडणुकीमुळे सोसायटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांचा मान आता वाढणार असून जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघणार आहे. नाशिक बाजार समितीसह, पिंपळगाव ब., लासलगाव या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. या बाजार समितीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या राज्यातील मोठ्या बाजार समिती असून यासह, देवळा, सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव, मनमाड, दिंडोरी, घोटी, कळवण, सुरगाणा, मालेगाव याठिकाणी देखील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामुळे गावापासून शेताच्या बांधापर्यंत या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.

या निवडणकीसाठी प्रारूप मतदार यादी सोमवारी (दि.१४) प्रसिद्ध करण्यात आल्या असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदार यादीचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी जाहीर केली आहे.

जाहीर झालेल्या पत्रकानुसार सोमवार १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आली २३ नोव्हेंबरपर्यंत त्यावर हरकती नोंदविता येणार असून२४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय दिला जाईल. ७ डिसेंबर रोजी या बाजार समित्यांच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here