Bacchu Kadu | नवनीत राणांचा प्रचार नाही, पराभव करणार; बच्चू कडू कडाडले

0
33
Bacchu Kadu
Bacchu Kadu

Bacchu Kadu |  काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांना भाजपने आमरावतीतून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. मात्र, नवनीत राणांच्या या उमेदवारीला बच्चू कडू यांचा आधीपासूनच विरोध होता. मात्र, बच्चू कडुंचा हा विरोध फेटाळून भाजपने राणा यांना तिकीट दिले आहे. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून, त्यांनी आपली नाराजी मध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. तसेच यावेळी त्यांनी नवनीत राणा यांन पाडण्यासाठी पर्यायांचा शोध सुरू असल्याचेही सांगितले. (Bacchu Kadu)

दरम्यान, काल भाजपने आधी नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेचे तिकीट दिले. आणि उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी आपल्या ‘युवा स्वाभिमान पार्टी’च्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षाचे संस्थापक आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याकडे दिला. यानंतर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. मात्र त्यांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. (Bacchu Kadu)

Bacchu kadu : आणि म्हणून मला गुवाहाटीला जावं लागलं ; नाराज बच्चू कडूंनी बोलून दाखवली मनातली खदखद

राणा यांना कसं पडता येईल याचं नियोजन सुरू 

यावेळी बच्चू कडू म्हणाले की,”नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी आम्हाला मान्य नाही. मी त्यांचा प्रचार करणार नाही. तर याउलट त्यांचा परभव करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले. तसेच, उमेदवारी दिली म्हणजे विजय होत नाही. अजून तर फक्त उमेदवारीच जाहीर झाली आहे. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आणि आपण ते सगळं व्यवस्थित करू. एकतर दुसरं कुणाला उमेदवारी देऊ आणि त्याला निवडून आणू. किंवा दुसऱ्या सक्षम उमेदवाराला समर्थन देऊन नवनीत राणा यांना पाडता येईल का? या बाबींचं नियोजन सुरु असंही यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. (Bacchu Kadu)

Bachchu Kadu | बच्चू कडुंनी बोलून दाखवली नाराजी, म्हणाले ‘भिकार** योजना..’

Bacchu Kadu | रवी राणांची कडुंना हात जोडून विनंती

दरम्यान, नवनीत राणा यांचे पती आणि युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष रवी राणा याबाबत म्हणाले की,”नवनीत राणा या आधीपासूनच एनडीएसोबतच आहेत. आम्हीदेखील एनडीसोबत आहोत. आमची विचारधारादेखील एक असून, नवनीत राणा यांनी मोदीजींच्या नेतृत्वात काम केलं आणि आता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्या नक्कीच ३ लाखांच्या वर मताधिक्याने विजयी होतील. मात्र, बच्चू कडू यांनी विरोध केला असून, त्यांना मी हात जोडून विनंती करतो की तेही एनडीएचा एक घटक आहेत. सगळे मिळून यासाठी काम करतील. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती रवी राणा यांनी बच्चू कडू यांना केली. (Bacchu Kadu)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here