Nitesh Rane | बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार – आ. राणे

0
10

Nitesh Rane | ठाकरे कुटुंब काल दुपारी डेहराडूनला रवाना झाले, यावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस छत्तीसगडच्या दौऱ्यावर असल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर  टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देत ट्विट करत ठाकरेंना राणे यांनी सुनावले आहे.

यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही? हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते, सहलीसाठी नव्हते गेले.असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, मराठा आंदोलनादरम्यान फडणवीस पक्षाच्या प्रचारासाठी  छत्तीसगढ दौऱ्यावर असताना ठाकरेंनी टीका केली होती. त्यावरून नितेश राणे यांनी आता निशाणा साधला आहे. ठाकरे कुटुंब  काल दुपारी डेहराडूनला रवाना झाले आहे.

Gold Silver Rate | दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी पुन्हा झळाळले…

बेबी पेंग्विनला अटक होणार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना लवकरच अटक होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बिथरले आहे, असा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी याआधी केला होता. दरम्यान, आज पुन्हा राणेंनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता त्यांना डिवचले आहे. नितेश राणे म्हणाले, सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात लवकरच बेबी पेंग्विनला अटक होण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपूर्वी बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. आणि त्याच्या काही दिवसांआधी दिशा सालियाने हीने देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी या दोन्ही आत्महत्या प्रकरणांत आदित्य ठाकरे यांचे नाव रोवले होते. या प्रकरणाचा तपास हा सध्या सीबीआय करत आहे. आदित्य ठाकरे हे लवकरच देश सोडून जाणार आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत व दिशा सालिया आत्महत्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे ते देश सोडून जाणार आहेत. असेही राणे म्हटले होते.

India cricket team: भारतीय संघ हा इतिहास रचणार…! जो क्रिकेटच्या ५० वर्षांच्या इतिहासात घडला नाही


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here