Skip to content

सलमान खान ड्रग्स घेतो, आमिर खानविषयी माहित नाही; बाबा रामदेवचा बॉलिवूडवर निशाणा


दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव हे त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. आता त्यांनी नुकताच केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

बाबा रामदेव यांनी नुकतीच मुरादाबाद येथील आर्यवीर महासंमेलनात हजेरी लावली होती. त्यावेळी संमेलनातील ‘ड्रग फ्री इंडिया’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी बॉलिवूड व खान मंडळींवर वादग्रस्त टीका केली आहे. तसेच त्यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकार अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा आरोप करत अनेक बड्या कलाकारांचे नाव घेऊन टीकास्त्र सोडले आहे. या टीकेनंतर त्यांनी उपस्थित लोकांना अंमली पदार्थांपासून मुक्त होण्याचे आवाहन केले.

बॉलीवूड सिनेसृष्टीवर केले हे आरोप

ते यात म्हणतात, “की शाहरुखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला. सलमान खानही ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल मला माहित नाही. तर, बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल तर न बोललेलेच बरे, त्यांचे तर देवालाच माहिती आहे. त्यामुळेच संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले आहे.

दरम्यान, या महासंमेलनात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील मुरादाबादला पोहोचले होते. पण त्याआधी याच ठिकाणी बाबा रामदेव यांचा एक व्याख्यानपार कार्यक्रम झाला होता. त्यात त्यांनी व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करतानाच, व्यसनमुक्तीसाठी स्वतःला वेळ द्या, असे आवाहन लोकांना केले. यावेळी त्यांनी खान त्रिकुट व बॉलिवूडचे नाव घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, याआधी बॉलिवूडच्या ड्रग्जच्या कनेक्शनबद्दल अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर ड्रग्ज कनेक्शनची चर्चेला अधिकच पेव फुटले. त्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स एनसीबीच्या निशाण्यावर आहेत. मागच्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. मात्र, आर्यनविरोधात ठोस पुरावा न सापडल्याने या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

अमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन

बाबा रामदेव यांनी पुढे म्हणताना बोलले, की आपणही एक निश्चय केला पाहिजे की, संपूर्ण भारत भूमी ही ऋषीमुनींची भूमी असून आपण पूर्णपणे नशामुक्त केली पाहिजे. त्याची समाजाला गरज असून या अमली पदार्थांमुळे लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे आजच विडी, सिगारेट, दारू यांसारखे अमली पदार्थ सोडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच ते हेही म्हणाले की, मी कुंभमध्ये चिलीम सोडण्याची मोहीम सुरू केली होती. साधूंना असे आवाहन करतो की, तुम्हाला सर्व काही मिळेल. पण, ही चिलीम सोडा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!