Ayodhya Ram Mandir | श्रीरामाच्या जयघोषात नाशिकहून साधू-महंत अयोध्येकडे रवाना

0
12
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir | देशात २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर फक्त आयोध्येतच नाहीतर संपूर्ण देशात भक्तिमय आणि उत्सवाचे वातावरण आहे. या दिमाखदार सोहळ्यासाठी देशभरातून भाविक भक्त आणि साधू-महंत हे अयोध्येत दाखल होत आहेत.

आज सकाळी संकेश्वर आणि करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्यासह राज्यभरातील अनेक साधू आणि महंत हे अवध नगरी म्हणजेच अयोध्येच्या दिशेने रवाना झालेले आहेत. यावेळी साधू-महंतांवर पुष्प वर्षाव करत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी साधू-महंत भावनिक झाल्याचे दिसून आले, “आम्ही दर्शनासाठी मोठ्या उत्सुकतेने जात आहोत. हा आमच्यासाठी अत्यंत भाग्याचा दिवस” असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.(Ayodhya Ram Mandir)

Ram Mandir | मुख्यमंत्र्यांचे राज्यातील मंदिरांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण कोणाला?

अयोध्येतील या भव्यदिव्य सोहळ्याचे देशातील सर्वच मान्यवरांना निमंत्रण पत्र हे पाठविण्यात आलेले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह एकूण ६ हजारांपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाचे साक्षीदार असणार आहेत. हा दिवस दिवाळीच्या सणासारखा संपूर्ण देशभरात साजरा केला जणार आहे. दारम्यान, या सोहळ्याचं निमंत्रण पत्र समोर आलं आहे.(Ayodhya Ram Mandir)

या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत. यात प्रामुख्याने, मंदिरात सकाळी ११ वाजता प्रवेश करावा लागेल. हा कार्यक्रम किती तास चालेल? या कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे हे बेकायदेशीर असेल? या सर्व बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच १५ जानेवारी ते २४ जानेवारी या काळात काही विधी होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. तसेच, या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अनेक संप्रदायातील संत महंत हे उपस्थित असणार आहेत. (Ayodhya Ram Mandir)

Ram Mandir | जे भाजपला नाही जमले ते ठाकरेंनी करून दाखवले

Ayodhya Ram Mandir | या तरखेपासून मंदिर सामन्यांसाठी खुले… 

रामलल्लाच्या अभिषेकाच्या आधी तीन दिवस सामान्य भाविक भक्तांना दर्शन घेता येणार नाही. २२ जानेवारी रोजी मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. त्यामुळे २० आणि २१ जानेवारी रोजी कोणत्याही भाविकांना प्रभू रामाचे दर्शन घेता येणार नाही. या दिवशी फक्त  प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रित असलेल्यांनाच रामलल्लाचे दर्शन घेता येणार असून, २३ जानेवारीपासून सामान्य भाविकांना राम मंदिराचे आणि रामाचे दर्शन घेता येणार आहे. संपूर्ण भारतातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे आतापासूनच अयोध्येतील सर्व हॉटेल आणि निवसस्थाने ही फुल्ल झालेली आहेत. या दोन दिवसांत अयोध्येत मोठा भक्तांचा जनसागर लोटण्याची शक्यता आहे.(Ayodhya Ram Mandir)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here