Crime : आणि त्याने थेट पत्नीला भररस्त्यात पेटवून दिले…!

0
22

मुलगा होत नाही म्हणून पती करत असलेल्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून त्याच्यापासून वेगळे राहणाऱ्या पत्नीच्या अंगावर रागातून पेट्रोल टाकून तिला भर रस्त्यात जाळल्याचा प्रकार मुंबईच्या चुनाभट्टी पोलीस ठाणे परिसरात घडला आहे. यामध्ये सरिता गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पती संजय ठाकूर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

सरिता आणि संजय यांचा तेरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. संजय हा गणेश मूर्ती कारागीर असून तो मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात राहतो. सरिता व संजयला चार मुली असून देखील संजय मुलगा व्हावा यासाठी सरीताला मारहाण करत तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होता. याच जाचाला कंटाळून सरिता गेल्या दीड वर्षांपासून आपल्या चारही मुलींना सोबत घेऊन वेगळे राहत होती. मात्र यात संजय ने तिच्या चरित्रावर ही संशय घ्यायला सुरुवात केली. व वेळ तिच्या घरी जाऊन तिला मानसिक त्रास देऊन धमक्या देण्यास सुरुवात केली . पत्नी वेगळे राहते याचा राग मनात धरून त्याने बुधवारी सकाळी सरिताला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ती कामावर जात असताना तिचा पाठलाग करत तिला अण्णाभाऊ साठे मार्गावरील उड्डाण पुलावर गाठले यावेळी तीच्या सोबत रस्त्यावरच वाद घालायला सुरवात केली. तसेच त्याने सोबत आणलेल्या बाटली मधील पेट्रोल सारिताच्या अंगावर टाकत लाईटरने पेटवून दिले व तेथून काढला.यावेळी तेथून जाणाऱ्या इस्माईल शेख नावाच्या ऑटोचालकाने तिच्यावर पाण्याची बाटली ओतली आणि तिला रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली व घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपाससूत्रे हाती घेतली. दरम्यान सरिताला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या पती विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 504 (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान), 506 (गुन्हेगारी धमकी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here