Assembly Election | आज राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली असून सकाळी 7 वाजेपासून मतदानासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे. राज्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान झाले होते. तर नाशिक जिल्ह्यामध्ये 6.93% मतदान झाले होते. यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात 18.82 टक्के इतके मतदान झाले आहे.
Assembly Election | नाशकात युती-आघाडीच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क
9 वाजेपर्यंत जिल्ह्यात किती टक्के मतदान झाले?
आज सकाळी 9 वाजेपर्यंत, मालेगाव मध्य मतदारसंघात 9.98, बागलाण 6.11, नांदगाव 4.92, चांदवड 6.49, कळवण 8.91, मालेगाव बाह्यमध्ये 6.30, नाशिक मध्य 7.55, इगतपुरीत 6.88, नाशिक पश्चिम 6.25, नाशिक पूर्व 6.43, देवळाली 4.42, दिंडोरी 9.71, निफाड 5.40, येवला 6.58, सिन्नर 8.09 असे जिल्ह्यात एकूण 6.93 टक्के मतदान पार पडले होते.
11 वाजेपर्यंत जिल्ह्यात 18.82 मतदान पूर्ण
तर सकाळी 11 वाजेपर्यंत, नांदगाव मतदारसंघात 16.46, बागलाण येथे 18.23, मालेगाव मध्य मतदारसंघात 22.76, मालेगाव बाह्य मध्ये 17.37, निफाड येथे 18.42, चांदवड 21.30, सिन्नर 21.10, येवला 20.92, इगतपुरी 20.43, नाशिक पूर्व 13.90, नाशिक पश्चिम 16.32, दिंडोरी 26.41 इतके सकाळी जिल्ह्यात एकूण 18.82 टक्के मतदान झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम