Assembly Election | नाशकात युती-आघाडीच्या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

0
26
#image_title

Assembly Election | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर सोमवारी थंडावला असून आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सकाळपासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.

Assembly Election | नाशकात प्रचाराचा धुरळा; आत्तापर्यंत परवानगीचे 415 अर्ज दाखल, नाशिक पश्चिममधून सर्वाधिक अर्ज

या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क  

दरम्यान जिल्ह्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. महाविकास आघाडीचे निफाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल कदम यांनी ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालय केंद्र 122 मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला असून मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार आसिफ शेख यांनी पत्नीसह मतदान केले आहे. त्याचबरोबर मालेगाव मध्ये आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

Assembly Election | नाशकात निवडणुकीची रणधुमाळी सुरू; आज ‘या’ दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज

त्याचबरोबर, मालेगाव बाह्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील सोयगाव येथे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला असून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल कदम व महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांनी देखील निफाडमध्ये मतदान केले आहे. त्याचबरोबर कळवण-सुगरण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांनी दळवट येथे सहकुटुंब मतदान केले असून याशिवाय नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी डॉ. शेफाली भुजबळ यांच्यासह येवला येथील जनता विद्यालयात मतदान केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here