Assembly Election | भाजपाने रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी आपल्या 29 जणांची यादी जाहीर केल्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर सध्या महायुतीतील घटक पक्षांनी यादी जाहीर केली असतानाच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यात उद्धवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून टोकाचे मतभेद असल्यामुळे शरद पवार मध्यस्थी करत असल्याचे बोलले जात होते, अशातच आता राष्ट्रवादी पक्षाची 39 संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे.
Assembly Election | भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नाशिकमधून कोणाला मिळाली संधी??
यादीत ‘या’ उमेदवारांना संधी
या संभाव्य उमेदवारांच्या यादीत 11 विद्यमान आमदारांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता असून तासगावमध्ये दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या ऐवजी मुलगा रोहित पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये अनेक माजी आमदारांचाही समावेश असून गेल्या वेळी विधानसभा लढलेल्या काही उमेदवारांचा या यादीत समावेश आहे.
शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी पुढीलप्रमाणे:
* इस्लामपूर – जयंत पाटील
* कळवा-मुंब्रा – डॉ. जितेंद्र आव्हाड
* काटोल – अनिल देशमुख
* घनसावंगी – राजेश टोपे
* कराड ऊत्तर – बाळासाहेब पाटील
* कर्जत जामखेड – रोहित पवार
* राहुरी – प्राजक्त तनपुरे
* तासगाव-कवठे महांकाळ – रोहित पाटील
* विक्रमगड – सुनील भुसारा
* शिरूर – अशोक पवार
* शिराळा – मानसिंग नाईक
* कोरेगाव – शशिकांत शिंदे
* बीड – संदीप क्षीरसागर किंवा ज्योती मेटे
* इंदापूर – हर्षवर्धन पाटील
* घाटकोपर पूर्व – राखीताई जाधव
* सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे
* बारामती – युगेंद्र पवार
* कागल – समरजीत घाटगे
* पारनेर – राणी लंके
* मुक्ताईनगर – रोहिणीताई खडसे
* माण खटाव – प्रभाकर देशमुख
* जामनेर – दिलीप खोडपे
* चाळीसगाव – राजीव देशमुख
* अकोले – अमित भांगरे
* पाथर्डी – प्रतापराव ढाकणे
* बागलाण – दिपीकाताई चव्हाण
* हडपसर – प्रशांत जगताप
* खडकवासला – सचिन दोडके
* आंबेगाव – देवदत्त निकम
* माळशिरस – उत्तमराव जानकर
* चंदगड – नंदाताई कुपेकर- बाभूळकर
* केज विधानसभा – पृथ्वीराज साठे / अंजली घाडगे
* अहेरी – भाग्यश्री आत्राम
* जळगाव शहर – गुलाबराव देवकर आप्पा
* किनवट – प्रदीप नाईक जाधव
* वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
* पाथरी – बाबजानी दुराणी
* जिंतूर – विजय भाबंळे
* भोकरदन – चंद्रकांत दानवे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम