Crime News | चोरीच्या घटनेतील एक संशयित आरोपी इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या सराईत इराणी चोरट्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर इराणी चोरट्यासह २० ते २५ जणांच्या जमावाने दगडफेक करत हल्ला चढवला. या हल्ल्यात आठ ते दहा पोलीस जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी वस्ती येथे घडली.
या इराणी वस्तीला चोरट्यांची वस्ती म्हणून ओळखले जाते. चैन स्नेचिंग, भूलथापा मारुन अनेक लाखो नागरिकांना आत्तापर्यंत येथील चोरट्यांनी लूटले आहे. जिल्ह्यात किंवा राज्यातच नव्हे तर पूर्ण देशभरात या इराणी चोरट्यांचे जाळे पसरले आहे.
पोलिस ह्या इराणी चोरट्यांना पकडण्यासाठी जातात; पण, अनेकदा या वस्तीतील इराणी चोर पोलिस पथकांवर हल्ले करतात. या हल्ला करणाऱ्यांत महिलांचाही समावेश असतो. दरम्यान, अंधेरी पोलिस ठाण्याचे पोलिस एका आरोपीच्या शोधात येथे गेले होते. त्यांच्यासोबत खडकपाडा पाेलिस ठाण्याचेही काही पोलिस होते.
Pandharpur | कार्तिकी महापूजेचा उपमुख्यमंत्र्यांचा मान मनोज जरांगेंना..?
दोन आरोपी फरार
या वस्तीतून रात्री २ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने तीन इराणी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. तिघांना घेऊन परत जाताना इराणी वस्तीतील महिला- पुरुष व चोरट्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना विरोध केला व दगडफेक सुरु केली.
या दगडफेकीत १० पोलिस जखमी झाले आहेत. रात्री अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती. आणि ह्याच गोंधळाचा फायदा घेत अटक केलेल्या तीन पैकी दोन चोरट्यांनी तेथून पळ काढला. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Nashik news | मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम