Asiatic Softshell turtle : पैशांचा पाऊस पडेल या अंधश्रद्धेने आपल्या घरी कासव आणणाऱ्या दोघा जणांना ताब्यात घेतल आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील ही घटना असून ताब्यात घेण्यात आलेल्या कासवाला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आल आहे.
गुप्तधन शोधण्यासाठी आजही विविध प्राण्यांचा वापर केला जात असल्याचं वारंवार अधोरेखित होत आल आहे. यातच कासवाचा वापर हा पैशांचा पाऊस पाडण्यासाठी होतो अशी अंधश्रद्धा आजही ग्रामीण भागात टिकून आहे. यामुळे विशिष्ट प्रजातीच कासव शोधण्यासाठी अनेक जण लाखो रुपये मोजत असतात असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या गोंड पिंपरी तालुक्यात राहणाऱ्या प्रमोद भागाकार पोटे (वय 37 राहणार भंगार पेठ) व रवींद्र व्यंकोजी मडपल्लीवार (वय 36 राहणार शिवनी देशपांडे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
दरम्यान प्रमोद पोटे यांच्या घरी दुर्मिळ प्रजातीचा ऍसिएटिक साफ्ट शेल हा कासव त्याने आणला असल्याची कुणकुण चंद्रपूर पोलिसांना लागली. यावेळी गोंड पिंपरी पोलिसांनी प्रमोद पोटे यांच्या घरी छापा टाकून घराची झाडाझडती घेतली असता यावेळी हा दुर्मिळ प्रजातीचा कासव त्या ठिकाणी आढळून आला आहे. हा कासव पोटे यांनी रवींद्र व्यंकोजी मडपल्लीवार यांच्याकडून खरेदी केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून पोलिसांनी या दोघाही जणांना ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या स्वाधीन केले व जप्त करण्यात आलेला कासव हा पंचवीस हजार रुपये किमतीचा असून या कासवाला चंद्रपूर येथील रेस्क्यू सेंटरला पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जीवन राजगुरू, वंदिराम पाल, नंदकिशोर माहूरकर, प्रेम चव्हाण, अनुप निकुरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक महेश कोंढवा, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस हवालदार प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मुजावर अली, कार्तिक खणके आदींनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम