Ashok Chavhan | अशोक चव्हाण पक्षप्रवेशासाठी इतके उतावीळ का..?

0
51
Ashok Chavhan
Ashok Chavhan

Ashok Chavhan |  काल राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षातील त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काल सकाळपासूनच अशोक चव्हाण हे ‘नॉट रीचेबल’ होते. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकिचा आणि नाना पाटोले यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला.

यानंतर ते १५ फेब्रुवारी रोजी अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार होते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार ते आजच भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक आमदार अमर राजूरकर हे देखील आज भाजपात प्रवेश करणार आहेत. पण ना शक्तिप्रदर्शन, ना गाजावाजा अशोक चव्हाणांना पक्ष प्रवेशाची इतकी घाई का..? असा प्रश्न सर्वच स्तरांवरून उपस्थित केला जात आहे.(Ashok Chavhan)

Ashok Chavhan | काँग्रेसमध्ये मनमानी कारभार 

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की,”महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय राहीला नव्हता. तिथे सगळा मनमानी कारभार सुरू होता. तेसच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी महत्वाचं विधान केलं असून, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काँग्रेसची तयारी नव्हती, असंही अशोक चव्हाण म्हणाले.(Ashok Chavhan)

Ashok Chavhan | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर..?

काल अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, मध्यमांसमोर बोलताना ते म्हटले की,”येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ. पण ते आजच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते आज दुपारी १२ वाजता अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार असून, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.

कुठे आणि कधी पार पडणार पक्षप्रवेश?

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून, आज दुपारी १२ वाजता मुंबईमधील भाजप पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार अमर राजूरकर यांचाही भाजप पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी काही आमदारही जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे आणखी कोणते नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत जातात हे पाहणं असणार आहे.(Ashok Chavhan)

Lok Sabha 2024 | काय सांगता..! आता खासदार अमोल कोल्हेही…

आजचाच मुहूर्त का?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्याववर येणार असून, त्यांच्या उपस्थितीतक हा पक्षप्रवेश होणार होता. दरम्यान, आता भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले असून,  आता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यानंतर ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.(Ashok Chavhan)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here