Arvind Kejriwal | अन् भाजपने ‘आप’च्या अडचणी वाढवल्या..?

0
20
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

Arvind Kejriwal |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक राजकीय घडामोडी होत असून, जसे राज्यात ईडीचे धाड सत्र सुरू आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या एकामागोमाग एक धाडी पडत आहेत. आता हेच सत्र दिल्लीतही सुरू असल्याचे दिसत आहे. काल दिल्ली गुन्हे शाखेचे पथक हे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचलं होतं. यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटिस बजावली आहे. ‘दिल्लीतील आपचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू’ असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता.

याच संदर्भातील तपासासाठी दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी काल केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. पण यावेळी अरविंद केजरीवाल हे त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केलेल्या या कथित आरोपांच्या समर्थनार्थ त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. यानंतर दिल्ली गुन्हे शाखेचे एक पथक हे मंत्री आतिशी मार्लेना यांच्यादेखील घरी पोहोचले होते.(Arvind Kejriwal)

Kalyan | भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच शिंदेंच्या नगरसेवकावर झाडल्या गोळ्या

Arvind Kejriwal | नेमकं प्रकरण काय..?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्री आतिशी मार्लेना यांनी “भाजपकडून आम आदमी पार्टीचे काही आमदार फोडल्याचा दावा केजरीवालांनी नेमका कोणत्या आधारावर केला? होता. याची चौकशी दिल्ली गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या या कथित आरोपांच्या समर्थनार्थ त्यांच्याकडे कोणता पुरावा आहे?

तसेच, जर काही पुरावे असतील तर ते गुन्हे शाखेला द्यावे, त्याबाबत सखोल चौकशी केली जाईल, असं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलं आहे. मागील आठवड्यातच केजरीवाल यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून असा दावा केला होता की, त्यांच्या आप या पक्षाच्या ७ आमदारांसोबत भाजपने संपर्क साधला होता. यानंतर भाजपने तात्काळ त्यांचे सर्व आरोप हे निराधार असल्याचे सांगत. त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून आता याप्रकरणी तपास सुरु आहे.(Arvind Kejriwal)

Deola | गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या देवळा पोलिसांकडून उद्धवस्थ

पाचव्यांदाही केजरीवाल गैरहजर 

दिल्ली येथील कथित ‘मद्य धोरण’ या घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने आता तब्बल पाचव्यांदा समन्स बजावलेले आहे. यापूर्वीच्या चारही समन्समध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर राहिले नाही. तसेच यामागे आपल्या विरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, यानंतर आता पाचव्यांदा केजरीवालांना समन्स बजावला असून, त्यांना २ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं.(Arvind Kejriwal)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here