13 घरफोड्यांसह दुचाकी चोरीतील मास्टरमाइंड जाळ्यात; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

0
9

जळगाव – शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याबाबत आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी पथक नियुक्त करुन गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील तरुणास अटक केली असून, त्याने आजवर 13 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. तर त्याच्याकडून 4 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरात गस्ती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली होती. नीरज देविप्रसाद शर्मा (रा. फरकाबाद, उत्तरप्रदेश) नावाच्या इसमाने जळगांव शहरात बरेच घरफोडीचे गुन्हे केले आहेत. बऱ्याच मोटारसायकल चोरलेल्या आहेत. तो सध्या शिव कॉलनी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लागलीच शिव कॉलनीत जावून नीरज देविप्रसाद शर्मा याचा शोध घेतला असता, तो एका विना नंबरच्या मोटार सायकलवर फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चार मोटरसायकल जप्त
आरोपीने जळगांव शहरातील खोटे नगर, मुक्ताईनगर, मानराज पार्क परिसर, पिंप्राळा परिसर भागात घरफोड्या केल्याबाबत कबुली दिली. तसेच जिल्हापेठ, रामानंदनगर आणि जळगांव तालुका पोलिस ठाण्यात एकूण 13 गुन्हे घरफोडी चोरीचे उघडकीस आले असून एकूण 4 मोटार सायकल, सोन्याचे दागिने, 3 टी.व्ही. संच, कॉम्प्यूटर, लॅपटॉप, इन्व्हर्टर, बॅटरी, भांडे व इतर मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीविरुध्द यापूर्वी सन 2007 मध्ये जिल्हापेठ पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here