Manoj Jarange| त्यांच्या कानात बोळे घातलेय का..?, आता बोलता येतंय तोपर्यंतच या- मनोज जरांगे

0
34

Manoj Jarange| राज्य सरकारसोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यांना विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरंही मिळाली नाही. त्यांच्या उत्तरासाठी दोन-तीन दिवस वाट बघणार आहे. माणुसकी समजत नसेल तर, त्यांना उत्तर मराठाच आहे. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असे तानाजी सावंत संगत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे का संगत नाही. त्यांनी लगेच याबद्दल काय ते सांगावे, असा सवाल मनोज जरांगे यांनी सारकारला केला आहे.

यावर मिडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नाही, समोरासमोर येऊन चर्चा करायला पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. यावर उत्तर देत जरांगे म्हणाले , “ त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाहीत असे मी सांगितलं आहे. मात्र, फक्त एकदाच चर्चा होईल. जोपर्यंत मला बोलता येतंय, तोपर्यंतच चर्चेसाठी आले पाहिजे. त्यानंतर येऊनही काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला अडवणार नाहीत. आरक्षण द्यायचंय की नाही ते एकदाच येऊन सांगायचं, बाकी काही वळवळ करायची नाही, असा इशारा जरांगे दिल आहे.

Big News | मराठा समाज आक्रमक; दौंडमध्ये मराठा आंदोलनकांनी राऊतांना अडवलं!

त्यांच्या कानात बोळे घातलेय का..?

फडणवीस यांनी कानात बोळे घातलेत काय? मी या म्हटलंय ना, चर्चेला… पण, फक्त एकदाच या. मला बोलता येतंय का ते बघा. आणि आजच्या आजच या. त्यानंतर मग मला बोलता येणार नाही. फक्त एकदाच या. आरक्षण द्यायचं की नाही सांगा. बाकीची चळवळ करू नका, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे.

Devendra fadanvis| मी ब्राह्मण म्हणून सॉफ्ट टार्गेट; देवेंद्र फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here