ACB : पंधरा हजारांची लाच स्वीकारत असताना पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

0
16

ACB : कालच त्रंबकेश्वर तालुक्यातील एका तलाठी आणि कोतवालाला दोन हजार रुपयांची लाज स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. या घटनेला काही तास उलटत नाही तोच एक पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.

 

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर अटक करण्यात आली आहे. गणपत महादू काकड असं या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून गुरुवारी दुपारच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये त्याला लाच स्वीकारत असताना अटक केली आहे. तक्रारदाराकडे 354 प्रमाणे दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच काकड याने मागितली होती. तडजोडी अंतही रक्कम पंधरा हजार रुपयांवर फायनल करण्यात आली. यानंतर गुरुवारी दुपारी ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिक रोड पोलीस ठाणे येथून काकड याला रंगेहात ताब्यात घेतल आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक बडे मासे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिक विभागात करण्यात येत असलेल्या सगळ्यात मोठ्या कारवाया असून यामुळे लाचखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. Corraption मात्र दिवसेंदिवस समोर येत असलेल्या या लाचखोरीच्या घटनांमुळे नाशिक विभागामध्ये भ्रष्टाचाराच जाळ किती खोलवर रुतल आहे याचा अंदाज अलगद बांधला जाऊ शकतो.

 

मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,anti corruption raid
मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. श्री. नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मागरदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

 

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, anti corruption raid  किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक- 02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – नाशिक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here