धूर फवारणीसाठी मनपा तिसऱ्यांदा निविदा मागवणार

0
11

द पॉईंट नाऊ: नाशिक शहरात धूरफवारणी करण्यासाठी महापालिकेने तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्या कार्यकाळात काढलेल्या फेरनिविदेची प्रक्रिया आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही रद्द केल्याने धूरफवारणीसाठी आता तिसऱ्यांदा टेंडर काढण्याची वेळ मलेरिया विभागावर आली आहे. या प्रक्रियेंतर्गत वादग्रस्त, तसेच दोन वर्षांपासून सातत्याने मुदतवाढ मिळविणाऱ्या ठेकेदारावरच पुन्हा मुदतवाढीची मेहेरबानी झाली आहे. शहरातील डेंग्यू, चिकनगुनिया सह साथींचे आजार रोखण्यासाठी महापालिकेकडून ठेकेदारामार्फत औषधे व जंतुनाशकांची फवारणी केली जाते.

ठेकेदारांकडून कागदावरच फवारणी होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांसह नागरिकांकडून केल्यानंतरही मलेरिया विभागाने मे. दिग्विजय एंटरप्रायजेस या कंपनीला पुन्हा ठेका मिळावा यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे केली होती. या ठेकेदारांकरिता तीन वर्षांचे टेंडर १९ कोटींवरून थेट ४६ कोटींवर नेऊन ठेवला होता. विद्यमान ठेकेदारालाच हे काम मिळावे यासाठी अटी व शर्ती सोयीच्या करण्यात आल्या होत्या. या वादग्रस्त अटी व शर्तीमुळे, तसेच प्रक्रिया संशयास्पद वाटल्याने तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी निविदा प्रक्रियाच रद्द केली होती. परंतु, ठेकेदाराने त्यास उच्च न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळवली होती. दोन वर्षांपासून स्थगिती कायम होती.

आता जुन्या ठेकेदारांवरच म मुदतवाढीची मेहेरबानी

महापालिका क्षेत्रात सध्या धूरफवारणीचे काम करणाऱ्या मे. दिग्विजय एंटरप्रायजेस या ठेकेदारावर वारंवार मुदतवाढीची मेहेरबानी केली जात आहे. करोनाचा लाभ घेत ठेकेदाराने मलेरिया विभागाशी हातमिळवणी करीत न्यायालयाचा संदर्भ घेत सातत्याने दोन वर्षे मुदतवाढ मिळविली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याने विद्यमान ठेकेदारावर पुन्हा मुदतवाढीची मेहेरबानी केली जाणार आहे. ठेकेदार कागदावर काम करीत असतानाही त्याच्यावर होणारी मेहेबानी आता चर्चेचा विषय बनली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here