नाशिक: श्रीराम भक्त हनुमानाच्या जन्मस्थळावरुन सुर झालेला वाद आता आणखीच वाढला आहे. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ नसून कर्नाटक येथील किष्किंदा असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अंजनेरी ग्रामस्थांनी व साधू महंतांनी रास्ता रोको करत गोविंदानंद यांचा निषेध केला.
गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्या वक्तव्याचा नाशकातील साधू-संतांसह अंजनेरी येथील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला. गोविंदानंद यांचा निषेध करण्यासाठी शेकडो ग्रामस्थ, साधुसंतासह रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. अचानक करण्यात आलेल्या या रास्ता रोकोमुळे त्र्यंबकेश्वर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
नाशिकच्या धर्मपंडितांना आव्हान
कर्नाटकातील किष्किंदाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी वाल्मिकी रामायणानुसार हनुमानाचा जन्म अंजनेरीत नव्हे तर किष्किंदात झाल्याचा दावा करून नाशिकच्या धर्मपंडितांना धर्मसभेचे त्यांनी आव्हान दिले आहे. कर्नाटकातील किष्किंदाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांच्या दाव्यावर ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घे्तला आहे. अंजनेरीच्या गावकऱ्यांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सर्व पुरावे आमच्याकडे असून, वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय ग्रामसभेच्या बैठकीत घेतला आहे.
नाशिकरोडला आज धर्मसंसद
या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.31) नाशिकरोड येथील महर्षी पंचायतन सिद्धपीठम आश्रमात सकाळी अकरा वाजता धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महंत श्री स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी दिली. किष्किंधा (कर्नाटक) येथील गोविंदानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धर्मसंसद होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम