सेनेला मोठा धक्का; सेनेचे चाणक्य परबांना अटक होणार ? सलग 9 तास चौकशी

0
2

मुंबई : सेनेला मोठा धक्का मानला जात असून शिवसेनेला दिवसभरातील दुसरा आणि मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. सेनेचे चाणक्य अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे. एका बाजूला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार संकटात आलेले असतानाच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना अटक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून मागील ९ तासांपासून परब यांची ईडी चौकशी सुरु आहे. त्याचवेळी परब यांच्या समर्थनार्थ ईडी ऑफिसबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेही जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याची माहिती आहे.

कोकणातील दापोली तालुक्यातील मुरूड मधील बहुचर्चित साई रिसॉर्टवरुन अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. किरीट सोमय्या यांनी परब यांना अंगावर घेत कारवाईसाठी पाठपुरावा केला आहे. या रिसॉर्टप्रकरणी ईडीने परब यांच्या घरावर छापे टाकून तपास केला होता. शिवाय मुरुड येथे या रिसॉर्टसंबंधी जवळपास ७ दिवस चौकशी केली असून. या तपासादरम्यान ईडीने मुरूड ग्रामपंचायत, दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय अशा ठिकाणी जाऊन पुरावे, कागदपत्रे जमा केल्याची माहिती आहे.

केंद्राने महाराष्ट्र सरकारला साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्टवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हे पत्र ३१ मे २०२२ रोजी राज्य सरकारला पाठवले असल्याची माहिती आहे. राज्याने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे.

यासंबंधी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारी २०२२ ला केलेल्या तक्रारीनंतर, कोस्टल झोन नियम मोडल्याचे सांगत राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा अहवाल मागवण्यात आला आहे. राज्य सरकारने काय कारवाई केली आहे, अशी विचारणा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पत्रावर राज्य सरकार नेमके कोणते उत्तर देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

काय आहे प्रकरण?

सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर या रिसॉर्टप्रकरणी गंभीर आरोप केले. २०१७ मध्ये एक कोटी रुपये खर्च करून मंत्री अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्या जवळ साई रिसॉर्टची जमिन खरेदी केली. पुढे २०१७ ते २०२० या काळात साई रिसॉर्टवर २५ कोटी रुपये खर्च केले.

३० डिसेंबर २०२० रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परब यांनी त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना १.१० कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. याशिवाय हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रारही सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here