Skip to content

अंधेरीतील माघारी नाट्यानंतर कोणाचे आभार, तर कोणाची प्रतिक्रिया ? वाचा इथेच


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे वातावरण आता या माघार नाट्याने संपले आहे, असे दिसत आहे. कारण भाजपचा उमेदवाराने जरी यातून माघार घेतली असली, तरी अन्य अपक्षांच्या उमेदवारीमुळे ही पोटनिवडणूक अखेर होणार आहे.

पण हे सर्व जरी असले, एकूणच निवडणुकीत उभे असलेले उमेदवारांचा व एकूणच अंधेरीतील सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्याच गळ्यात आमदारकीची माल पडणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे जरी घेतला. त्यानंतरही जवळपास ७ ते ८ अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. पण त्यानंतर अर्ज माघारीची मुदत संपल्यामुळे आता ऋतुजा लटके यांच्यासमोर तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत.

एकूणच आजच्या या सगळ्या घडामोडींनंतर आता राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या माघारीनंतर देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. त्यांनी तसे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी काल केलेय विनंतीला मान देऊन आपण उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस व भाजपमधील अन्य नेत्यांचे आभार मानले. तसेच, त्यांनी असेही म्हटले की सुदृढ समाजासाठी एक चांगली व सकारात्मक राजकीय संस्कृती आवश्यक असते. ती अशीच असावी, वाढवावी व राजकीय मंचावर सर्व पक्षांनी अनेक मुद्द्यांवर निकोप स्पर्धा करावी, असे म्हटले आहे.

काहीच हरकत नाही – पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. आता या माघारीनंतर प्रथमच त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना माझी भाजपाकडे कोणतीच मागणी नव्हती, फक्त सल्ला दिला होता. पण कोणाच्या सांगण्याने जर झाले असेल तरी माझी हरकत नाही. ही वर्षं दीड वर्षांची निवडणूक होती, जे गृहस्थ गेले त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्यानंतर आपण असाच निर्णय घेतो, असे म्हणत याला उशिर झाला असला, तरी सकारात्मक निर्णय झाला हे महत्त्वाचे आहे. आणि यात आनंद आहे, असेही ते म्हणाले.

ट्विटरवरून कॉंग्रेसची भाजपवर टीका 

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. त्यासंदर्भात एक व्हिडीयोही त्यांनी पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात की, भाजपने निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने उमेदवार मागे घेतला असला, तरी शिवसेना फोडण्याचे पाप आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना त्यांना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही, अशी टीका केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!