पंतप्रधानांसह आता गृहमंत्र्यांचा महत्वपूर्ण महाराष्ट्र दौरा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नाशिक दौऱ्यावर

0
14

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मंगळवारी देहू दौरा आहे. तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 21 जून अर्थात योग दिनाला ते त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या गुरुपीठ येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे. अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आणि स्थानिक शासकीय प्रशासनाची तयारी चालू आहे.

चंद्रकांतदादा मोरे आणि डॉ. दिकपाल गिरासे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी मोरे आणि गिरासे यांनी अमित शहा यांनी श्री स्वामी सेवा मार्गाच्या विविध कामांबाबत माहिती देतांना, श्री स्वामी समर्थ गुरुपीठास भेट देण्याचे आमंत्रण देखील दिले. त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा असणार आहे.

दरम्यान, अमित शहा यांच्या या भेटीवेळी सर्व प्रमुख नेतेमंडळी, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख अधिकारी वर्ग उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मंगळवारी (दि. 14 जून) रोजी देहू येथे श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर देहू येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी येथील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here