येत्या ३१ तारखेपासून नाशिकहून निघणाऱ्या या चार विमानसेवा होणार बंद

0
4
air

नाशिक : ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिककरांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपासून नाशिकहून निघणाऱ्या चार विमानसेवा बंद होणार आहेत. अलायन्स एअर या कंपनीने तशी घोषणा केली आहे.

एअर इंडियाची उपकंपनी असलेली अलायन्स एअर कंपनीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत ही विमानसेवा दिली जात आहे. ज्या शहरांमध्ये विमानतळ आहे पण तेथे प्रवास विमानसेवा दिली जात नाही, अशा शहरांसाठी केंद्र सरकारने उडान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ओझर विमानतळावरून ही विमानसेवा सुरु झाली होती. या योजनेच्या माध्यमातून अलायन्स इंडिया कंपनीने ही सेवा सुरू केली. मात्र, येत्या ३१ सप्टेंबरपासून कंपनीच्या नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली आणि नाशिक-पुणे-बेळगाव या विमानसेवा बंद होणार आहेत. आता दिवाळीतच ही सेवा बंद होत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

सर्वात आधी, नाशिकहून पुणे, अहमदाबाद आणि हैद्राबाद यातील शहरांसाठी प्रारंभी सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर हैदराबाद सेवा बंद करण्यात आली, मात्र कंपनीने अहमदाबाद व पुणे ही सेवा अतिशय उत्तम पद्धतीने सुरु ठेवली. त्यास प्रवाशांचा मोठ्या प्रतिसादही लाभला. यानंतर कंपनी नाशिक-अहमदाबाद मार्गे दिल्ली आणि नाशिक-पुणे मार्गे बेळगाव या शहरांसाठी विमानसेवा सुरु केली होती. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने प्रवासी कंपनीच्या या सेवांचा लाभ घेत आहेत. असे असतानाही आता केंद्र सरकारच्या उडान योजनेचा कालावधी संपत असल्याने अखेर या सेवा बंद होत आहेत.

दरम्यान, सेवा बंद होत असल्याचे कळताच खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाशी संपर्क केला. मात्र मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे, की विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही उड्डाण योजना आहे. ती कायमस्वरूपी देता येणार नाही, तसेच या योजनेद्वारे संबंधित शहरात विमान सेवा सुरू राहू शकते की नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्या व्यावसायिक पद्धतीने त्या-त्या शहरात सेवा सुरू असते.

दरम्यान, एचएएल प्रशासनाने अलायन्सद्वारे दिल्या जाणाऱ्या शहरांसाठी अन्य विमान कंपन्यांनी सेवा देण्याचे पत्र विमान कंपन्यांना दिले आहे. तरी यासंदर्भात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, पर्यटन व अन्य क्षेत्रातून होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here