द पॉइंट नाऊ अकोला : छोट्या उमरी परिसरात एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सदर युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिक सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन हद्दीत मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली आहे.
उमेश अंबादास अटाळकर, वय ३५ रा.लहान उमरी निबंधे प्लॉट, असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे कर्मचारी पाहोचले.
अकोला शहरातील छोट्या उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या उमेश अंबादास अटाळकर या युवकावर अज्ञात युवकांनी प्राणघातक हल्ला केला. या युवकांनी उमेशच्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी झालेल्या उमेशला तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिक्षातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, त्याच्या कुटुंबीयांनी व त्याच्या मित्रांनी रुग्णालय गाठले. ही घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असण्याची घटनास्थळी सुरू होती. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही . मारेकऱ्यांमध्ये किती लोकांचा सहभाग आहे, हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही.या सर्व मारेकऱ्यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मारेकरी आणि मृतक उमेश हे सोबत होते. अचानक यांच्यामध्ये वाद झाले आणि वादाचे रूपांतर हत्येपर्यंत पोहचले. हा वाद सुरू असताना येथे उपस्थित असलेल्या एका युवकाने मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याच्या हाताला यामध्ये दुखापत झाल्याची माहिती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम