सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील जगभरात ओळख असलेले व धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्रबिंदू असलेल्या सर्वतीर्थ टाकेद येथे गुरुवार ता.१२ अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता उत्साहात संपन्न झाली.प्रसिद्ध नामवंत कीर्तनकार ह भ प मनोहर महाराज घोडे यांच्या सुंदर अश्या मार्गदर्शन पर काल्याच्या किर्तनाने ही सांगता करण्यात आली.कीर्तन सेवेनंतर काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.
तद्नंतर गावातील प्रत्येक घरातील महिलांनी लहानग्या मुलींनी विविध मराठी संस्कृती पोशाख परिधान करत,सजून नटून थटून डोक्यावर तुळसी वृंदावन ,कळशी घेऊन गाव फेरीतील मुख्य सांगता दिंडीत सहभाग नोंदवला व सर्वांची मने आकर्षण करून जिंखली,या वेळी गावातील प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या फुलांचा सडा सजावट काढलेल्या दिसून आल्या तसेच दिंडी गावातील हनुमान मंदिर येथे नगर प्रदक्षिणा पूर्ण करून आल्यानंतर मंदिरासमोर ग्रामस्थांनी भारुड , फुगडी , भवरा, राधा कृष्ण राधा इत्यादी खेळांचा मनमुराद आनंद साजरा केला तसेच दहीहंडी फोडून कार्यक्रम संपन्न झाला.
अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 54 वे ( चोपन्न वे ) महाप्रसाद पंगत गावचे शिक्षक श्री. अशोक बन्सीलाल पगारे यांनी दिली सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दिंडी समयी अखंड हरिनाम साप्ताहात आलेल्या गावातील लहान -थोर सर्व ग्रामस्थांना मदन गायकवाड,निलेश गायकवाड यांच्याकडून उसाचा ताजा रस देण्यात आला तर दत्तू जाधव यांच्या कडून चहा वाटप करण्यात आला.
अखंड हरिनाम साप्ताहसाठी गावातील लहान -थोर मोठ्यांनी सहभाग दर्शविला या वेळी भजनी भारुड कडे सर्वांचे लक्ष वेधले होते तसेच आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सप्ताह कमिटी टाकेद बु. तर्फे आभार मानण्यात आले व त्यानंतर पुढील वर्षाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका बनविण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम